MANORANJAN

लवकरच बंद होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कार्तिकी गायकवाडशी आहे खास कनेक्शन, गायिका पोस्ट करत म्हणाली….

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यामुळे आता जुन्या मालिका ऑफ एअर होतं आहे. कोठारे व्हिजनची निर्मिती असलेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका लवकरच बंद होणार आहे. नुकतंच मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस पार पडला. यावेळी केक कापून कलाकारांनी शेवटचा दिवस साजरा केला. तेव्हा कलाकार भावुक झालेले पाहायला मिळाले. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले. पहिल्या पर्वात गौरी आणि जयदीप कथा होती. तर दुसऱ्या पर्वात गौरी आणि जयदीपच्या पुर्नजन्माची कथा होती. या दोन्ही कथा प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या. पण, आता मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर, अमेय बर्वे, हर्षदा खानविलकर, गिरीश ओक अशी तगडी कलाकार मंडळी असलेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या लोकप्रिय मालिकेशी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड खास कनेक्शन आहे. त्यामुळे तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. हेही वाचा – “आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या… कार्तिकी गायकवाडने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं शीर्षकगीत गायलं होतं. त्यामुळे तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे. कार्तिकीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका आपला निरोप घेतं आहे. मालिकेच्या शीर्षकगीताच्या निमित्ताने या मालिकेचा एक भाग होता आलं. हे गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं. कारण युट्यूबवर हे गाणं आतापर्यंत २ कोटी ७० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी ऐकलं, याचा आनंद आहे. या गाण्याची एक वेगळी जागा हृदयात कायम राहील. हेही वाचा – तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र ठेवलंय जपून, कारण सांगत म्हणाली, “माझ्या आयुष्यातली…” A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad – Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9) हेही वाचा – अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…” दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या रात्री ११ वाजता प्रसारित होतं आहे. पण, या मालिकेची जागा ‘अबोली’ मालिका घेणार आहे. कारण ‘अबोली’ मालिकेच्या वेळेत म्हणजे रात्री १०.३० वाजता २३ डिसेंबरपासून ‘तू ही रे माझा मितवा’ ही नवीन मालिका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका बंद होणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.