MANORANJAN

Year Ender 2024 : ‘हे’ १० चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर, बॉक्स ऑफिसवरील कमाईसह प्रेक्षकांचीही मिळवली पसंती; वाचा यादी

२०२४ हे वर्ष भारतीय सिनेमासाठी महत्त्वाचे ठरले. २०२४ मधले १०० कोटी, ४०० कोटींच्या सिनेमांसह ६०० कोटी आणि १००० कोटी क्लब एवढी कमाई करणारे अनेक सिनेमे होते. या सिनेमांनी कमाईचे अनेक विक्रम मोडले. तर काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड तोडताना प्रेक्षकांच्या मनातही घर केले. यात बॉलीवूडसह साऊथच्या अनेक सिनेमांचा समावेश आहे. आज आपण २०२४ वर्षातील टॉप १० ब्लॉकबस्टर भारतीय सिनेमांची यादी पाहूयात. ‘सॅकलिंक’ या वेबपोर्टलने २०२४ वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमांची यादी दिली आहे. यात बॉलीवूडमधील ४ तर चार ६ दाक्षिणात्य सिनेमांचा समावेश आहे. हेही वाचा… “अमिताभ बच्चन यांचा मुलगा समजून त्यांनी मला…”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला किस्सा; म्हणाला, “ऐश्वर्या राय थांबली अन्…” Pushpa 2 : या यादीत पहिल्या क्रमांकावर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा सिनेमा आहे. ५ डिसेंबर २०२४ ला हा चित्रपट भारतासह संपूर्ण जगभरात हा प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम तयार केले तर काही विक्रम मोडले. प्रदर्शनाआधीच हा सिनेमा हजार कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. तो अंदाज खरा ठरला असून, जगभरात या चित्रपटाने १ हजार ३९३ कोटी कमावले आहेत. यात भारतात ११६० कोटी तर जगातील इतर देशांत २३३ कोटी कमावले आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुनसह फहाद फासील आणि रश्मिका मंदाना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हेही वाचा… Year Ender 2024: बजेट कमी असूनही गाजवले बॉक्स ऑफिस, यंदा प्रदर्शित झालेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का? Kalki 2898 AD : अमिताभ बच्चन, प्रभास व दीपिका पादुकोण यांसारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली. २७ जून २०२४ रोजी हा सिनेमा भारतासह जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ग्रँड ओपनिंग करून अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले होते.या चित्रपटाने भारतात ७६७ कोटी तर जगभरातील जगभरात (वर्ल्डवाईड) १०४३ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. Stree 2 : या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे हॉरर-कॉमेडी सिक्वल ‘स्त्री २’, या सिनेमाने ब्लॉकबस्टर जगभरात तब्बल ८७४.५८ कोटींचा गल्ला जमवला. भारतात ७१३ कोटींची कमाई आणि जगभरातील इतर देशात प्रदर्शन झाल्यावर १४४ कोटी मिळवत, या चित्रपटाने प्रेक्षकांना विनोद आणि भयाचा जबरदस्त संगम दाखवून आपलेसे केले. या सिनेमात राज कुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका होत्या. हेही वाचा… Video : “मौसम बदलने वाला है…”; ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला प्रेक्षकांच्या भेटीला, हाथीराम चौधरीच्या मानेवरील ‘ती’ तारीख पाहून नेटकरी म्हणाले… Devara Part 1 : कोराताला शिवा दिग्दर्शित ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने भारतात ३४५ कोटींची जगभरात (वर्ल्डवाईड) या सिनेमाने ४२२ कोटींची केली आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषेत चित्रपटाला प्रेक्षक उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. Bhul Bhulaiyya 3 Movie : ‘ दिवाळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), तृप्ती डिमरी (Tripti Dimpri), विद्या बालन व माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘भूल भुलैया 3’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनीस बज्मी दिग्दर्शित या हॉरर कॉमेडी सिनेमाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. या चित्रपटाने भारतात ३११ कोटीं तर जगभरात ३८९ कोटींची कमाई केली. हेही वाचा… ॲटलीच्या दिसण्यावरून कमेंट करण्याबद्दल कपिल शर्माने दिलं उत्तर; म्हणाला, “मेंढरासारखे कोणाचेही…” Goat (Greatest Of All Time) Movie : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता थलपती विजयचा ‘गोट’ सिनेमा ५ सप्टेंबर २०२४ ला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली होती. या सिनेमाने भारतात २९६ कोटी तर जगभरात ४५७ कोटींची कमाई केली होती. Singam Again Movie : रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा हा बिग बजेट सिनेमा १ नोव्हेंबर २०२४ रोजी म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अजय देवगण, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाने भारतात २९७ कोटींची तर जगभरात ३७२ कोटींची कमाई केली होती. हेही वाचा… दिसण्याबद्दल विनोद करणाऱ्या कपिल शर्माला ॲटली कुमारने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “मी कसा दिसतो…” Fighter Movie : हृतिक रोशन, दीपिका पदुकोण व अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ हा चित्रपट गुरुवारी २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. या चित्रपटाने भारतात २५४ कोटी तर वर्ल्डवाईड ३५८ कोटी कमावले आहेत. Amaran Movie : ‘अमरन’हा दाक्षिणात्य सिनेमा मेजर मुकुंद वरदराजन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात मेजर मुकुंद (शिवकार्तिकेयन) आणि त्यांची पत्नी इंदू रेबेका वर्गीस (साई पल्लवी) यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. मेजर मुकुंद यांना काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. या सिनेमाने भारतात २५३ कोटींची कमाई केली होती. तर जगभरात इतर देशात या सिनेमाने ८० कोटींची कमाई केली होती. या सिनेमाने एकूण ३३३ कोटींची कमाई केली आहे. हेही वाचा… Video : लेकाच्या शाळेत २० वर्षांपूर्वीचं ‘ते’ एव्हरग्रीन गाणं ऐकून भावुक झाला शाहरुख खान! व्हिडीओ व्हायरल Hanuman Movie : १२ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान’ हा दाक्षिणात्य सिनेमा यावर्षीचा एक ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. प्रशांत वर्मा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाने भारतात २३८ कोटींची कमाई केली. तर जगभरातील इतर देशांत या सिनेमाने ५७ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने एकूण २९५ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचा ‘जय हनुमान’ नावाने सिक्वेल येणार असून यात कांतारा फेम अभिनेता रिषभ शेट्टी हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.