MANORANJAN

“अमिताभ बच्चन यांचा मुलगा समजून त्यांनी मला…”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला किस्सा; म्हणाला, “ऐश्वर्या राय थांबली अन्…”

सोनू सूद (Sonu Sood) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या २००८ मधील ‘जोधा अकबर’ चित्रपटात ऑनस्क्रीन भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनूने चित्रपटाच्या सेटवरील अनुभव आणि ऐश्वर्या रायबरोबरचा त्याच्या कायम लक्षात राहिलेल्या संवादाबद्दल सांगितले. सोनूने ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मला आठवतंय, ‘जोधा अकबर’ सेटवर मी आणि ऐश्वर्या राय एक सीन करीत होतो. ती बोलत होती आणि अचानक थांबली. ती म्हणाली, ‘तू मला पापा (अमिताभ बच्चन)ची आठवण करून देतोस.’ ती खूप गोड आहे आणि उत्कृष्ट को-स्टार आहे. माझं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर चांगलं नातं आहे. अभिषेकबरोबर मी ‘युवा’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ सिनेमांत काम केलं आहे. अमिताभ बच्चनसरांबरोबर मी ‘बुड्ढा होगा तेरा बाप’मध्ये काम केलं आहे. ते खूप छान लोक आहेत, त्यांच्याबरोबर काम करणं नेहमीच मजेशीर असतं.” हेही वाचा… पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं? काही काळापूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उपस्थित असताना सोनूने सांगितले होते की, इजिप्तच्या प्रवासादरम्यान लोकांना तो अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आहे, असे वाटले होते. “मी जसा इजिप्तला पोहोचलो, तिथल्या लोकांना मी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा आहे, असं वाटलं. ते म्हणाले, ‘अमिताभ बच्चनचा मुलगा, अमिताभ बच्चनचा मुलगा.’ त्यामुळे मला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली. त्यांनी मला रांगेतून बाहेर काढलं आणि वेगळं नेलं. मला खूप चांगलं वाटलं,” असे तो म्हणाला. हेही वाचा… ‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…” त्याच एपिसोडमध्ये सोनूने ‘बुड्ढा होगा तेरा बाप’च्या एका सीनबद्दल सांगितले. या सीनमध्ये त्याला अमिताभ बच्चन यांना ढकलायचे होते. “बच्चन सर पोलीस स्टेशनमध्ये येतात. मी पोलीस ऑफिसरची भूमिका साकारत होतो आणि मला त्यांना मागे ढकलून सांगायचं होतं, ‘निकल जाओ पोलीस स्टेशन से’. मी दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांना सांगितलं, ‘तुम्ही मला त्यांना नमस्कार करण्याऐवजी ढकलायला सांगत आहात.’ मग मी त्यांना हळूच ढकललं. पण बच्चन सर म्हणाले, ‘घाबरू नकोस, जोरात ढकल.’ आणि शेवटी मी घाबरतच त्यांना जोरात ढकललं आणि तो सीन छान झाला,” असे सोनूने सांगितले. सोनू सूद लवकरच ‘फतेह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, त्यात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.