MANORANJAN

“आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…

अभिनेता सुबोध भावेचा आज, २० डिसेंबरला ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आनंद गोखले दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटात सुबोध भावे अथश्रीच्या भूमिकेत झळकला आहे. या चित्रपटात सुबोधसह अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटगृहांबरोबर नाट्यगृहातही दाखवला जाणार आहे. त्यामुळे सध्या सुबोध भावे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सुबोध भावेने ‘मीडिया तक मराठी’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच सुबोधला विचारण्यात आलं की, मराठी चित्रपट आणखीन पुढे जाण्यासाठी अजून कोणते उपक्रम केले पाहिजेत? तेव्हा सुबोध भावे म्हणाला, “मला सध्या असं वाटतं की, आधी चित्रपटगृह मिळवून द्या. तेवढं सुद्धा आम्हाला, आमच्या निर्मात्यांना खूप आहे. आम्हाला आमची हक्काची जागा मिळवून द्या. आपल्या विषयातल्या चित्रपटांना, आपल्याच भाषेतल्या चित्रपटांना आपल्याच राज्यात दरवेळेस भीक का मागवी लागते? हा मोठा संशोधनाचा विषय आहे.” हेही वाचा – तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र ठेवलंय जपून, कारण सांगत म्हणाली, “माझ्या आयुष्यातली…” पुढे सुबोध भावे म्हणाली की, मल्टीप्लेक्समध्ये पाच-सहा स्क्रीन असतात त्यातल्या दोन स्क्रीन तुम्हाला कायम स्वरुपी मराठी चित्रपटांसाठी का ठेवता येत नाही? आणि एखाद्या मोठ्या हिंदी चित्रपटाचा निर्माता थिएटरला धमकी कशी काय देऊ शकतो? कुठल्याही चित्रपटांना स्क्रीन द्यायची नाही, म्हणून…आणि हे तुमच्या राज्यात तुम्ही चालवून कसं काय घेऊ शकता? याच कारण ना सरकारला काही पडलंय, ना कलाकारांना काही पडलंय, ना प्रेक्षकांना काही पडलंय. कोणाला कशाचंच काही पडलेलं नाहीये. चित्रपट चालो, मरो, तो निर्माता मरो, काहीही घडतो त्याचं. मराठी भाषेचही काहीही घडो, आपाल्याला आपल्या चित्रपटाचं सोडून द्या, आपल्याला आपल्या भाषेचंही काहीही पडलेली नाहीये. ती भाषा आपण बोलो, न बोलो.” हेही वाचा – “लग्नसंस्थेत मुलीच्या त्यागाची गोष्ट मोठी, मुलांना…”, सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “लग्न ही कायमच ज्वलंत समस्या…” “आता सांगली, कोल्हापूरमध्येही आपण रिक्षावाल्यांशी हिंदीत बोलायला लागतो. तेव्हा धक्का बसतो. हे हिंदीचं वार कुठंपर्यंत येणार आहे. आमच्यातले, चित्रपटात काम करणारे लोक त्यांना धड मराठी बोलता येत नाही. त्यांना मराठी लिहिता येत नाही. त्यांना मराठी वाचता येत नाही. स्वतःचे विचार आपल्या भाषेत मांडता येत नाही. ही आता भाषेची अवस्था आहे आणि आपल्याला आपली भाषा येत नाही, याचं वाईटही वाटतं नाही. आपल्या भाषेत आपले विचार व्यक्त करता येत नाही. महाराष्ट्रातील माणसं दोन वाक्य सुद्धा धड मराठी भाषेत बोलू शकत नाहीये. एकमेकांशी बोलताना मराठी माणूस कसा ओळखायचा तर आपली भाषा सोडून इतर भाषेचा आधार घेतो तो मराठी माणूस. कारण त्याला आपल्या भाषेत बोलणं, कमीपणा वाटतो, लाज वाटते. हे ज्याला वाटतं ना तो मराठी माणूस,” असं स्पष्टच सुबोध भावे म्हणाला. हेही वाचा – अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…” त्यानंतर अभिनेता म्हणाला, “मला असं वाटतंच विमानात, मॉल, ५ स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर इंग्रजी बोलता आलं पाहिजे किंवा हिंदीमध्ये बोलता आलं पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये मी का बोलू इतर भाषांमध्ये? मी मराठी भाषेत बोलेन तुम्ही इथे येऊन व्यवसाय सुरू केलाय ना. मग तुम्हाला त्या राज्याची भाषा आली पाहिजेत. मी गुजरातमध्ये गेलो तर मी गुजराती शिकेन. मी बंगालमध्ये गेलो तर बंगाली शिकेन. कारण मला त्या राज्याची भाषा आली पाहिजे. भारतात आहेत ना इतक्या भाषा मग त्या भाषा यायला नकोत. हा आग्रह कुठे करतोय आम्ही महाराष्ट्रात ना. आम्ही मध्य प्रदेशात चित्रपट लागला पाहिजे असा आग्रह करत नाहीये. मग इथेच जर तो लागला नाही तर कुठे लागणार आणि त्याला मराठी चित्रपट नाही, तर मराठी भाषेशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला इथे आदर, सन्मान मिळालाच पाहिजे. भाषा असो, साहित्य असो, शिक्षण असो, व्यवसाय असो काहीही असो ते त्या राज्याच्या भाषेत आहे ना मग सन्मान मिळाला पाहिजे. आम्ही हिंदी, इंग्रजी शिकू की. भारतातल्या इतरही भाषा शिकू, सगळ्या गोड आहेत. पण आपली भाषा आपल्याला आलीच पाहिजे.” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.