MANORANJAN

तुला वैष्णवी मालिकेच्या सेटवर भेटली…; ‘देवमाणूस’च्या निर्मातीची खास पोस्ट, किरण गायकवाडला म्हणाली, “तुझ्या आयुष्यात…”

Marathi Actor Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding : गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. रेश्मा शिंदे, शाल्व-श्रेया, निखिल राजेशिर्के यांच्या पाठोपाठ आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकला त्याचं नाव आहे किरण गायकवाड. ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या मालिकांमधून किरण घराघरांत लोकप्रिय झाला. छोट्या पडद्यावर जम बसल्यावर वैयक्तिक आयुष्यात त्याने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधली. किरण-वैष्णवीचा लग्नसोहळा कोकणात थाटामाटात पार पडला. त्यांच्या विवाहसोहळ्याला मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते. निखिल चव्हाण, सागर चव्हाण, महेश जाधव, राहुल मगदूम, पूर्वा शिंदे, ओंकार ढगे, अभिनव कुराणे या कलाकारांनी किरण-वैष्णवीच्या लग्नात धमाल केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय निर्माता तेजपाल वाघ, सुमीत पुसावळे, नितीश चव्हाण, श्वेता शिंदे ही मंडळी सुद्धा या जोडप्याच्या ( Kiran Gaikwad ) लग्नात उपस्थित होती. हेही वाचा : Video : आराध्या-अबरामचा शाळेत एकत्र परफॉर्मन्स! शाहरुख खान व ऐश्वर्या रायचा आनंद गगनात मावेना, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष किरण गायकवाडला ( Kiran Gaikwad ) लग्नसोहळा पार पडल्यावर शुभेच्छा देण्यासाठी अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळालं. श्वेता शिंदे अभिनेत्याला शुभेच्छा देताना लिहिते, “सर्वात आधी तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन! किरण मला खरंच खूप आनंद होतोय… शेवटी तुझ्या आयुष्यात तुला हवीतशी जोडीदार भेटली. महत्त्वाचं म्हणजे वैष्णवी तुला आमच्या ‘देवमाणूस’च्या सेटवर भेटली. तुम्हाला दोघांना आयुष्यात एक नवीन सुरुवात करत असल्याचं पाहून खरंच खूप आनंद होतोय. तुमचं वैवाहिक जीवन असंच सुखात जावो… तुम्ही दोघे कायम आनंदी राहा किरण आणि वैष्णवी तुम्हाला दोघांना माझ्याकडून खूप प्रेम” हेही वाचा : ‘इंद्रायणी’ मालिकेचं नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुरू आहे शूटिंग, अनुभव सांगत सांची भोईर म्हणाली, “थंडीमुळे दातखीळ….” A post shared by Shweta Shinde (@shwetashinde_official) हेही वाचा : Video : “या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच…”, अखेर शिवा व आशू एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार; मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो दरम्यान, किरण गायकवाड ( Kiran Gaikwad ) आणि वैष्णवी कल्याणकर यांचा लग्नसोहळा १४ डिसेंबरला कोकणात थाटामाटात पार पडला आहे. या दोघांनी एकत्र ‘देवमाणूस २’ मध्ये काम केलं होतं. ही रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने सगळेजण आनंद व्यक्त करत आहेत. नेटकऱ्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळींनी किरणला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.