MANORANJAN

तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल

Alia Bhatt Viral Video : कलाकार मंडळी कोणत्याही ठिकाणी जाताना नेहमी त्यांच्या खासगी वाहनांचा जास्त वापर करतात. खासगी वाहने त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची वाटतात. क्वचितच काही वेळा कलाकार त्यांच्या खासगी वाहनाऐवजी सार्वजनिक वाहनाने प्रवास करण्याचा पर्याय निवडतात. अशात आलिया भट्टनेसुद्धा शनिवारी रात्री उशिरा हा पर्याय निवडला आणि थेट रिक्षाने तिने स्वत:चं घर गाठलं. आलिया भट्ट कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या कामातील बऱ्याच अपडेट्स ती वेळोवेळी चाहत्यांना देते. शिवाय तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींमुळेसुद्धा ती चर्चेचा विषय ठरते. सध्या सोशल मीडियावर आलियाचा रिक्षाने प्रवास करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, आलिया भट्टने तिची आलिशान गाडी सोडून प्रवासासाठी रिक्षा निवडली आहे. हेही वाचा : ‘ मुरांबा ’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…” शनिवारी तिचं काम संपवून घरी जाताना आलियाने रिक्षाने प्रवास केला आहे. यावेळी अभिनेत्रीने ग्रे आणि पांढऱ्या पट्ट्या असलेला एक शर्ट आणि ग्रे रंगाची पँट परिधान केली आहे. कोणीही आपल्याला पटकन ओळखू नये म्हणून तिने तोंडाला मास्कसुद्धा लावला आहे. व्हि़डीओमध्ये आलियाबरोबर तिच्या ओळखीतील अन्य एका व्यक्तीनेसुद्धा प्रवास केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलंय. आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून सिनेविश्वात तिचं पहिलं पाऊल ठेवलं. पहिल्याच चित्रपटातून तिने चाहत्यांची मोठी प्रसिद्धी मिळवली. त्या आधी अक्षय कुमार आणि प्रिती झिंटाच्या ‘संघर्ष’ या चित्रपटात ती बालकलाकार म्हणून झळकली होती. आलियाने सिनेविश्वात पदार्पण केल्यावर फार कमी काळात जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. वीरा त्रिपाठीच्या भूमिकेतील तिच्या ‘हायवे’ या चित्रपटावरसुद्धा चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘शानदार’, ‘उड़ता पंजाब’, ‘राझी’, ‘गंगूबाई काठियावाडी’ असे आजवर अनेक हिट चित्रपट तिने बॉलीवूडला दिले आहेत. A post shared by Manav Manglani (@manav.manglani) हेही वाचा : लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल लवकरच आलिया यशराज फ़िल्म्सच्या थ्रिलर ‘अल्फा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव अ‍ॅण्ड वॉर’ या आगामी चित्रपटातही आलिया झळकणार आहे. सध्या ती या दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगच्या कामात व्यग्र आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.