MANORANJAN

लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्क ट्रिपवर आहे. येथे ती पती निक जोनास आणि लेक मालतीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. प्रियांकाने ट्रिपमधील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. यात तिने लग्नाचा वाढदिवस कसा साजरा केला याची झलक दाखवली आहे. तसेच, ख्रिसमसचा महिना असल्याने न्यूर्यार्क शहर कसं सजलं आहे, हे फोटोमध्ये दिसत आहे. पण, या सगळ्यांत लक्ष वेधून घेतलं ते देसी गर्लच्या लेकीने. Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो सर्व फोटोंमध्ये प्रियांकाची लेक मालतीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण या फोटोत मालतीच्या हाताच्या बोटांना खोटी नखं लावण्यात आली आहेत. प्रियांकाने आपल्या लेकीच्या बोटांना ही खोटी नखं लावली आहेत. तिने मालतीबरोबरचे अनेक फोटो पोस्ट केलेत. त्यातील एका फोटोत ती लेकीला नखं लावत आहे, तर दुसऱ्या एका फोटोमध्ये तिने स्वत: मालतीचे दोन्ही हात एकमेकांना जोडून सर्व नखे दाखवली आहेत. आई-वडिलांचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या मुलांभोवती फिरत असतं हेच प्रियांकाचे फोटो पाहून समजत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या आणखी एका फोटोत तिची लेक एका बाहुलीबरोबर खेळताना दिसत आहे, तर आणखी एका व्हिडीओमध्ये मालती मजेमध्ये चालताना दिसत आहे. प्रियांकाने आपल्या लेकीबरोबर आणि पतीबरोबर खास क्षण घालवल्याचे सुंदर फोटो पोस्ट केलेत. तसेच याला कॅप्शन देत लिहिलं आहे, “एक सुखद छोटासा जादूचा क्षण.” निक जोनास आणि प्रियांकाने १ डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केलं. यंदाचा लग्नाचा वाढदिवस आणखी जास्त लक्षात राहावा म्हणून दोघेही लेकीसह न्यूयॉर्क ट्रिपवर गेले आहेत. याच ट्रिपमधील फोटो आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेत. निक जोनासनेसुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रियांका आणि लेकीबरोबरचे फोटो पोस्ट केलेत. यामध्ये त्याने पत्नी आणि लेकीबरोबर ‘मोआना २’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावलेली दिसतेय. तसेच कुटुंबाबरोबर घालवलेले अनेक खास क्षणांचे फोटो त्याने पोस्ट केलेत. हे फोटो पोस्ट करत “आमच्या लग्नाचा सहावा वाढदिवस, ‘मोआना २’, कुटुंबाबरोबर खास क्षण, न्यूयॉर्क शहर, याहून सुंदर काय असू शकतं, माझं मन भरून आलं…”, अशी कॅप्शन निकने दिली आहे. A post shared by Priyanka (@priyankachopra) हेही वाचा : सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…” निक आणि प्रियांका दोघांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच एका चाहत्याने “तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर आनंदी पाहणे मला आवडतं, या जगातील माझ्या दोन आवडत्या व्यक्तींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशी कमेंट केली आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.