MANORANJAN

Video : सूरजसह गावच्या शेतात रमली जान्हवी किल्लेकर! चक्क ट्रॅक्टरही चालवला; नेटकरी म्हणाले, “भावा-बहिणीचं नातं…”

Bigg Boss Marathi Suraj Chavan And Jahnavi Reel Video : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा एकूण १७ स्पर्धकांनी प्रवेश घेतला होता. या सगळ्या स्पर्धकांचं एकमेकांशी आपुलकीचं नातं तयार झालं. सूरजला घरात अंकिता, इरिना, जान्हवी, निक्की यांनी राखी देखील बांधली होती. यंदा शो लवकर संपला असला तरीही यामधल्या स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने जान्हवी खास सूरजच्या मोढवे गावी गेली होती. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. भाऊबीजेनिमित्त जान्हवी किल्लेकर ( Bigg Boss Marathi ) खास सूरज चव्हाणच्या गावी गेली होती. यावेळी अभिनेत्रीचा लेक, तिचे पती किरण किल्लेकर हे देखील उपस्थित होते. जान्हवीने लाडक्या भावाला मिठी मारत त्याची भेट घेतली तसेच त्याची विचारपूस देखील केली. भाऊबीजेसाठी नक्की गावी येईन असा शब्द जान्हवीने सूरजला दिला होता. हा शब्द अभिनेत्रीने खरा करून दाखवला आहे. मात्र, याशिवाय या भावा-बहिणीने गावात रानात फिरून एकत्र धमाल केल्याचं देखील एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हेही वाचा : डिंपल यांच्या हातात होती ऋषी कपूर यांची अंगठी; राजेश खन्नांनी प्रपोज करताना ‘ती’ अंगठी पाहिली अन्…; पुढे काय घडलं? वाचा सूरज चव्हाण जान्हवीला ( Bigg Boss Marathi ) त्याच्या गावचं शेत दाखवण्यासाठी घेऊन गेला होता. याचा व्हिडीओ या ‘गुलीगत किंग’ने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. गावच्या शेतात जान्हवी देखील रमल्याचं यामध्ये पाहायला मिळत आहे. “काळी माती, नीळ पानी, हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याच्या भुईला या भार…” या लोकप्रिय गाण्यावर या दोघांनी खास Reel व्हिडीओ शेअर केला आहे. सूरजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हे बहीण-भाऊ रानात फेरफटका मारताना, जान्हवी मिरच्या तोडताना तर, एका शॉटमध्ये चक्क ट्रॅक्टर चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. हेही वाचा : प्रियाला सणसणीत कानाखाली वाजवणार सायली! घटस्फोटाचं कारस्थान होणार उघड; दाखवला ‘तो’ पुरावा, पाहा जबरदस्त प्रोमो A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151) “भाऊ-बहीण”, “भावा-बहिणीचं नातं असं सदैव असंच राहूदेत हीच प्रार्थना…या दोघांना ‘बिग बॉस’नंतर ( Bigg Boss Marathi ) एकत्र पाहून आनंद होत आहे”, “सूरज भाऊ मजा आहे”, “लवकरच भाऊ पिक्चर मध्ये येणार… रॉयल एन्ट्री”, “सूरज-जान्हवी दोघंही कमाल आहेत” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.