MANORANJAN

“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Swapnil Rajshekhar : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये अधिपतीच्या वडिलांची म्हणजेच चारुहासची भूमिका अभिनेते स्वप्नील राजशेखर साकारत आहेत. नुकतेच व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढत हे अभिनेते केरळ फिरण्यासाठी गेले आहेत. अर्थात सर्वसामान्य लोकांप्रमाणे केरळमधल्या निसर्ग सौंदर्याची भुरळ त्यांनाही पडली. स्वप्नील राजशेखर यांनी इतर पर्यटकांसारखं या जागेचं उघडपणे कौतुक न करता एक उपरोधिक पोस्ट शेअर करत प्रत्येक ठिकाणी पर्यटकांनी कसं वागलं पाहिजे याचा सल्ला काहीशा वेगळ्या अंदाजात दिला आहे. त्यांची पोस्ट पाहून अभिनेत्याला नेमकं काय सुचित करायचंय याचा मतितार्थ लक्षात येतो. हेही वाचा : वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण? स्वप्नील राजशेखर ( Swapnil Rajshekhar ) म्हणतात, “मी तीन दिवस झाले केरळमध्ये फिरायला आलोय. एक दिवस कोचीला होतो, त्यानंतर मुन्नार आणि आज इथे एर्नाकुलम नॅशनल पार्कमध्ये फिरायला आलो आहे. पण, मी आतापर्यंत जेवढे पैसे या ट्रिपमध्ये घालवले ते बुडले असं वाटतंय. मला त्रास होतोय, अस्वस्थ वाटतंय, सगळं वाया गेलंय असं वाटतंय. आता तुम्ही विचाराल असं का म्हणताय…या दाखवतो.” अभिनेते पुढे लिहितात, “हे केरळमधले रस्ते बघा…बघताय रस्ते? या केरळमधल्या रस्त्यांवर कागदाचा एकही बोळा पडलेला नाहीये. प्लास्टिकचा रॅपर दिसत नाहीये. कोल्डड्रिंकच्या रिकामी बाटल्या दिसत नाहीये, ना दारूच्या बाटल्या दिसत आहेत. कचऱ्याचा ढीग नाहीये, कुठेही कोणीही थुंकलेलं नाही. मला हे सगळं पाहून अस्वस्थ वाटतंय हो… नुसती शुद्ध हवा, नुसता शुद्ध ऑक्सिजन, फक्त सौंदर्य… असं असतं का? आपल्याला प्लास्टिक पाहिजे, कचऱ्याचा ढीग पाहिजे, दारूच्या बाटल्या पाहिजेत, बोंबाबोंब शिवीगाळ करणारी पोरं पाहिजेत… हे सगळं असल्याशिवाय मजा आहे का? हा नुसता निसर्ग पाहायचा का आपण, यासाठी एवढे पैसे घातलेत का मी? हे बरोबर नाहीये.” हेही वाचा : ‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…” “आता मी केरळ सरकारकडे जाणार आहे, कोर्टात सुद्धा जाणार आहे आणि सांगणारे माझे पैसे परत द्या. प्लास्टिक, दारूच्या बाटल्यांशिवाय निसर्गाला शोभा आहे का? सांगा मला… ही माझी फसवणूक आहे.” अशी उपरोधिक पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. A post shared by Swapnil Rajshekhar (@meeswapnil) नेटकऱ्यांनी त्यांच्या या पोस्टवर “मस्त मेसेज दिलाय स्वप्नील दादा…आता तरी लोक जाग्रुत व्हावेत”, “आईशपथ किती छान आहे सांगायची पद्धत”, “सर तुमचा कोल्हापुरी accent!”, “सणसणीत चपराक”, “झणझणीत अंजन घालणारी गोष्टी” अशा जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.