MANORANJAN

“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

Kareena Kapoor Khan : बॉलीवूडची बेबो नेहमीच तिच्या दमदार अभिनयासह अतरंगी कमेंटसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिच्या अभिनयाबरोबरच एखाद्या मुद्द्यावर तिने दिलेल्या प्रतिक्रिया आणि काही गोष्टींवर तिने केलेली टिप्पणी नेहमीच चर्चेत असते. आतादेखील बॉलीवूडची बेबो तिच्या सासूबाईंमुळे चर्चेत आली आहे. आज करीनाच्या सासूबाई शर्मिला टागोर यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे करीनाने त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शर्मिला टागोर यांच्याबरोबरचे काही फोटो पोस्ट केलेत. यातील पहिल्या फोटोमध्ये दोघी सासू सुना एकमेकांच्या शेजारी बसल्या आहेत, तर दुसऱ्या एका फोटोमध्ये शर्मिला टागोर यांनी हेअरस्टाईल करण्यासाठी केसांना एक क्लिप लावलाय. त्यासह त्यांनी रुबाबात डोळ्यांवर एक काळा गॉगलसुद्धा लावला आहे. आणखी एका फोटोत शर्मिला टागोर त्यांच्या नातवाचे लाड करताना दिसत आहेत. हेही वाचा : वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण? सासूबाईंचे गॉगल लावलेले असे फोटो पोस्ट करत करीनाने त्यांचा थेट कूल गँगस्टर असा उल्लेखही केला आहे. फोटो पोस्ट करत तिने “आतापर्यंतची सर्वात कूलेस्ट गँगस्टर कोण आहे?, हे मी सांगण्याची गरज आहे का?” असे दोन प्रश्न कॅप्शनमध्ये विचारलेत. पुढे “माझ्या सासूबाईंना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा”, अशी कॅप्शन तिने दिली आहे. सासूबाई कोणाचीही असो, ती सासूबाईच असते आणि तिचा दरारा वेगळाच असतो. अनेक महिला आपल्या सासूसमोर काहीही बोलताना घाबरतात. अशात बॉलीवूडच्या बेबोने आपल्या सासूबाईंना थेट कूल गँगस्टर म्हटल्याने तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. तसेच चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्समध्ये शर्मिला टागोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “त्या सर्वात खास आहेत. पहिल्या महिला सुपरस्टारपैकी एक”, “शर्मिला टागोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्या फार प्रेमळ आहेत”, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच “त्या फार सुंदर आहेत. ‘गुलमोहर’मधील त्यांचा अभिनय मला फार आवडला. त्यांनी आणखी काही प्रोजेक्टसाठी काम केलं पाहिजे”, अशी इच्छा एका चाहत्याने शर्मिला टागोर यांच्याबद्दल व्यक्त केली आहे. A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) हेही वाचा : Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने सांगितलेला अनुभव चर्चेत, “पांढऱ्या दाढीतील तो रहस्यमयी माणूस त्याने मला सांगितलं की…” दरम्यान, शर्मिला टागोर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, १४ वर्षांच्या असतानाच त्यांनी ‘वर्ल्ड ऑफ अपू’मधून कामाला सुरुवात केली. हा एक बंगाली चित्रपट होता. पुढे त्यांनी बॉलीवूडमध्येही अनेक चित्रपटांतून नाव कमावलं. शर्मिला यांना सैफ अली खान, सबा आणि सोहा अशी तीन मुलं आहेत. तसेच एकूण पाच नातवंडं आहेत. सारा, इब्राहिम, तैमूर, जहांगीर आणि इनाया अशी त्यांच्या नातवंडांची नावं आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.