MANORANJAN

“आधी आई-वडिलांचा विरोध…”, ‘बिग बॉस मराठी ५’ फेम जान्हवी किल्लेकर म्हणाली, “त्याचं तेव्हा लग्नाचं…”

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर(Jahnavi Killekar) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. सहाव्या स्थानावरून नऊ लाख घेत तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाचे मोठे कौतुकही झाल्याचे पाहायला मिळाले. जान्हवीने या शोमध्ये स्वत:ची टास्क क्वीन अशी नवीन ओळख तयार केली. ती घरात असताना तिच्याबरोबर तिच्या कुटुंबियांनादेखील टीकेला सामोरे जावे लागले. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. जान्हवी किल्लेकरने लोकशाही मराठी फ्रेंडली या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत जान्हवीने लग्नाबद्दल बोलताना म्हटले, “माझा नवरा उत्तम डान्सर होता आणि माझं डान्सवर प्रचंड प्रेम होतं. त्याचं कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली होती. सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या. लग्न करून मी त्याच्याबरोबर सुखात राहू शकतं, यावर माझा विश्वास होता. आधी मम्मी-पप्पांचा विरोध होता मात्र नंतर त्यांना पटलं.एखादे आई वडील काय बघतात. त्याचे कुटुंब चांगले आहे ना? त्याचं घर आहे ना? तर याचं सगळंच चांगलं आहे. याचा मुरुडला बंगलादेखील आहे. माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये वयाचं अंतर आहे. त्याचं तेव्हा लग्नाचं वय होतं आणि माझं नव्हतं.तो म्हणाला करूयात लग्न. आई-वडीलांनीदेखील परवानगी दिली. पण ते म्हणतो ना की नशिबात काही गोष्टी लिहिलेल्या असतात. तर कदाचित माझं करिअर लग्नानंतर घडणार असेल, असं काही असेल आणि तसंच झालं”, असे म्हणत जान्हवीने लग्नानंतर करिअरला सुरूवात झाल्याचे म्हटले आहे. हेही वाचा: गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा अन्…; ‘फँड्री’तील जब्या-शालूचा नवा फोटो चर्चेत; नेटकरी म्हणाले, “खरंच लग्न झालं का…” दरम्यान, जान्हवी किल्लेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती सतत पोस्ट शेअर करते. प्रेक्षकांचे तिला प्रचंड प्रमाणात प्रेम मिळत असल्याचे दिसते.आता ती कोणत्या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.