MANORANJAN

सकस चित्रपट कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत…; दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे मत

मराठी चित्रपटसृष्टीतून वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत कलात्मकदृष्ट्या सादरीकरण करणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून वेगवेगळा विषय देण्याचा प्रयत्न करत असतात. मराठीबरोबरच हिंदीतही चित्रपट आणि वेबमालिकांच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या नवनव्या वाटा चोखाळणाऱ्या गजेंद्र अहिरे यांनी तमाम मराठी स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पैठणीभोवती गुंफलेली गोष्ट त्याच नावाच्या वेबमालिकेतून लोकांसमोर आणली आहे. महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी आणि ती घडवणाऱ्या एका सामान्य स्त्रीचं भावविश्व, मुलीबरोबरचं तिचं घट्ट नातं आणि पैठणी विणण्याच्या तिच्या कामाबरोबरच गुंफलेले तिच्या स्वप्नांचे धागे असे अनेक पैलू या वेबमालिकेतून सुंदर पद्धतीने रंगवण्यात आले आहेत. या वेबमालिकेच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’शी बोलताना सातत्याने कलाकृती घडवत राहण्यात दंग असलेल्या गजेंद्र अहिरे यांनी सकस चित्रपट कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत, असं मत व्यक्त केलं. ‘पैठणी’ या वेबमालिकेबद्दल बोलताना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या साध्या माणसांची ही प्रेमळ गोष्ट आहे, असे गजेंद्र अहिरे यांनी सांगितलं. ‘ही वेबमालिका एका आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित तर आहेच, पण पैठणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे. ती संस्कृती घडवणाऱ्या गोदावरी नावाच्या स्त्रीची ही कथा आहे. आपली आई जी अमूल्य पैठणी विणते आहे, ती पैठणी साडी आईने कधीतरी नेसून मिरवावं असं मुलीला वाटतं. मुलीची ही इच्छा आई पूर्ण करू शकेल का? वरवर पाहता अत्यंत साधी वाटणारी अशी मुलीची इच्छा… त्याचीच ही गोष्ट आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे… या गाण्याप्रमाणे नात्यातील भावबंध उलगडणारी कथा या वेबमालिकेत पाहायला मिळेल’, असं अहिरे यांनी सांगितलं. हेही वाचा >>> किम कार्दशियनच्या पायाला गंभीर दुखापत; कुबड्यांचा आधार घेऊन फिरतेय अभिनेत्री, म्हणाली… या वेब मालिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि तरुण अभिनेत्री ईशा सिंग या दोघी मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या निवडीच्या प्रक्रियेबद्द बोलताना अहिरे म्हणाले, मी आणि मृणाल फार जुने मित्र आहोत. निर्मात्यांकडून तिचं नाव सुचवण्यात आलं. मुळात ती एका साध्या-सरळ स्वभावाची, सोज्वळ आई वाटते आणि मुळात हातमागावर बसल्यावर मृणाल ‘गोदावरी’ या पात्रासाठी शोभून दिसली असं मला वाटलं. म्हणून मृणालची या मुख्य भूमिकेसाठी निवड केली. तिच्या मुलीच्या भूमिकेत असलेल्या ईशा सिंगला मी यापूर्वी ओळखत नव्हतो. ती जेव्हा लुक टेस्टसाठी आली आणि तिने गोष्ट ऐकून ज्याप्रकारे कावेरीचं पात्र साकारलं, ते मला फार प्रभावी वाटलं. त्यामुळे ईशाची निवड झाली. संपूर्ण चित्रीकरणादरम्यान ईशा अत्यंत शिस्तबद्धतेने काम करत होती. या वेबमालिकेच्या निमित्ताने हातमागावर पैठणी विणण्याचं काम करणाऱ्या कारागिरांबद्दल बोलताना अहिरे म्हणाले, ‘या वेबमालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदा हातमाग बघितला. जेव्हा तो प्रत्यक्षात पहिला तेव्हा त्याचं विशेष कौतुक वाटलं, कारण एवढी मोठी साडी हातमागावर विणून तयार करणं, त्या धाग्यांना साडीचं रूप देणं हे खूप कठीण काम आहे. याबद्दल थोडीफार माहिती आणि वाचन असल्यामुळे फक्त एक वेबमालिका शूट करणं माझं ध्येय कधीच नव्हतं. तर त्या गोष्टीतील बारकावे या वेबमालिकेत उतरले पाहिजेत, यावर माझा भर होता. हातमागावर काम करणारे लोक कसे आहेत, त्यांची घरं कशी आहेत, तेथील दुकानं, त्यांचं आयुष्य हे सगळं काही मला या वेबमालिकेतून ठळकरीत्या प्रेक्षकांसमोर मांडायचं होतं आणि ते मी ‘पैठणी’तून मांडण्याचा प्रयत्न केला आहे’. हेही वाचा >>> प्रसिद्ध अभिनेत्री घरातील बाथटबमध्ये आढळली मृतावस्थेत ओटीटी माध्यमामुळे चित्रपट घराघरांत पोहोचले, या बदलांबद्दल बोलताना अहिरे म्हणाले, ‘प्रत्येक दिग्दर्शकाला काम करताना दोन गोष्टी आवश्यक असतात, एक मला या कामाचं समाधान मिळालं पाहिजे आणि दुसरं माझं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी काही दिवसांपूर्वी दोन लहान शाळकरी मुलींना बघितलं, ज्या घरात पलंगावर बसून टॅबवर चित्रपट बघत होत्या. चित्रपटगृहात एक शो लावून प्रेक्षकांची वाट पाहणाऱ्या माझ्यासाठी हा फार मोठा बदल आहे. ओटीटीमुळे चित्रपट घराघरांत पोहोचला आहे. पूर्वी हे शक्य नव्हतं, पण आता या ओटीटी माध्यमांमुळे चित्रपटच काय हव्या त्या कलाकृती हव्या त्या वेळेला पाहणं सहज शक्य झालं आहे’. ‘जागते रहो’, ‘तिसरी कसम’ यांसारखे अनेक चित्रपट आहेत जे अजरामर आहेत. त्यामुळे जे सकस, दर्जेदार चित्रपट आहेत ते कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाहीत, असं मत अहिरे यांनी व्यक्त केलं. उत्तम चित्रपट कितीही जुने झाले तरी ते पुन्हा पुन्हा पाहिले जातात आणि प्रेक्षकांनाही ते पाहायला आवडतात. त्यामुळे उत्तम चित्रपट कधीच मरत नाहीत, ते कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात, हेच खरं आहे अशी भावनाही अहिरे यांनी व्यक्त केली. अशी वेगळ्या विषयावरची वेबमालिका करण्याची कल्पना कशी सुचली याबद्दल बोलताना मला निर्मात्यांकडून ही कथा ऐकवण्यात आली आणि दिग्दर्शनासाठी विचारणा करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं. ही कथा ऐकल्यानंतर मला खूप छान आणि थोडी आपल्या संस्कृतीकडे झुकणारी अशी कथा असल्याचं मनोमन वाटलं. ‘झी ५’ कडून या चित्रपटासाठी काम सुरू झालं. त्यानंतर या चित्रपटाच्या कथा, पटकथा लेखनावर काम करायला मी सुरुवात केली. त्यासाठी प्रत्यक्ष पैठणला आणि येवल्याला जाऊन आलो. तेथील लोकांमध्ये राहून त्यांचे अनुभव विचारले, त्यांचं काम, त्यांचं जगणं समजून घेतलं आणि मग कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू झाली, असं अहिरे यांनी स्पष्ट केलं. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.