MANORANJAN

Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने सांगितलेला अनुभव चर्चेत, “पांढऱ्या दाढीतील तो रहस्यमयी माणूस त्याने मला सांगितलं की…”

Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉय ( Vivek Oberoi ) हा असा हिंदी सिनेसृष्टीतला असा अभिनेता आहे ज्याने थेट सलमान खानशी पंगा घेतला होता. ज्यामुळे त्याच्या करिअरमध्ये त्याला खूप लवकरच चढ उतार बघावे लागले होते. विवेक ओबेरॉय ( Vivek Oberoi ) भारत भरात प्रसिद्ध होता. त्याच्या अनेक चित्रपटांनी निर्मात्यांना चांगलेच पैसे कमवून दिले होते. मात्र ज्या वेगाने तो प्रगती, प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता, तेवढ्याच वेगाने त्याचा कठीण काळाही चालू झाला. याचं कारण होता सलमान खानवर त्याने केलेले आरोप. दरम्यान, याच विवेक ओबेरॉयने ( Vivek Oberoi ) त्याच्या कठीण काळाबद्दल बोलताना एक वेगळाच अनुभव सांगितला. त्याला भेटलेल्या एका पांढऱ्या दाढीतील एका साधूबद्दल सांगितलं आहे. विशेष म्हणजे हा माणूस माझ्यासाठी देवासारखा होता, असंही विवेक ओबेरॉयने ( Vivek Oberoi ) म्हटलं आहे. विवेक ओबेरायने ( Vivek Oberoi ) डॉ. जय मदान यांच्या यूट्यूब चॅनेललला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी एका गूढ व्यक्तीच्या भेटीबद्दल सांगिलं आहे. विवेक ओबेरॉयने ( Vivek Oberoi ) सांगितल्यानुसार विवेक ओबेरॉय २००४ मध्ये दक्षिण भारतात गेला होता. विवेक म्हणाला, मी त्या ठिकाणी एका गूढ व्यक्तिमत्वाच्या माणसाशी माझी भेट झाली, असं विवेक ओबेरॉय म्हणाला. “मी एका वर्षासाठी दक्षिण भारतात वास्तव्यासाठी गेलो होतो, असं विवेक म्हणाला. विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला, ( Vivek Oberoi ) “या काळात २००४ मध्ये त्सुनामी आली होती. त्या काळात मी त्यावेळी मदत आणि बचावकार्यात सहभागी झालो होतो. तिथे एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात मला एक चकित करणारा अनुभव आला. मी त्या काळात मानसिकदृष्ट्या चिंतेत होतो. माझ्यापुढे त्या काळात काही अडचणी होत्या. बचावकार्य करताना मी त्सुनामीतून वाचलेल्या लोकांसाठी एक तंबू उभा केला. याच तंबूत मीही राहू लागलो. या काळात मी थोडीफार तामिळ भाषा शिकलो. तेव्हा मला एका व्यक्तीने एका प्रसिद्ध मंदिरात जाण्यास सांगितलं. त्या मंदिरात एक पांढरी दाढी असलेला एक वृद्ध माणूस भेटला. त्या वृद्ध माणसाने फक्त धोतर नेसलेलं होतं. त्यांनीच मला त्यांच्याकडे बोलवलं होतं,” असं विवेक ओबेरॉयने सांगितलं. हे पण वाचा- “मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे”, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या रिलेशनशिपच्या…” विवेक ओबेरॉय म्हणाला, ज्या व्यक्तीने मला बोलवलं ती व्यक्ती माझ्याशी अस्खलित इंग्रजीत बोलत होती. ते मंदिराच्या एका कोपऱ्यात बसले होते. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि म्हणाले की तू फार चिंतेत दिसतो आहेस. तुझा वाईट काळ सुरु आहे. त्यामुळेच तुला या मंदिरात पाठवण्यात आलं आहे. तुला मोठा आर्थिक फटका बसून तुझं नुकसान होणार होतं. पण तू नशीबवान आहे. तुला जो फटका बसणार होता तोच पैसा तू या बचावकार्यात खर्च करतो आहे. हे तुझं कर्म आहे असं ते म्हणाल्याचं विवेक ओबेरॉय म्हणाला. एवढंच नाही तर ती व्यक्ती नंतर गायब झाली असंही विवेक ओबेरॉयने सांगितलं. त्या दाढीवाल्या वृद्ध माणसाने मला काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर एका दिशेने जाण्यास सांगितलं. मी निघून गेलो. मात्र त्या मंदिरात परत आलो तेव्हा ती पांढरी दाढी असलेली व्यक्ती मंदिरात नव्हती. मी मंदिरातली व्यक्ती कुठे गेली असं रक्षकाला विचारलं त्याने मला मंदिरात कुणीही नव्हतं असं सांगितलं. मला भेटलेली ती व्यक्ती कोण होती? खरी होती की खोटी? हा प्रश्न आजही मला पडला आहे असंही विवेक ओबेरॉयने सांगितलं. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.