MARATHI

Farmers Protest: शंभू सीमेवर शेतकरी-पोलीस आमने-सामने, अश्रुधुराचा मारा केल्याने विरोध आणखी तीव्र

Farmers Protest: दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतक-यांचं आंदोलन संघटनांनी आजच्या दिवसापुरतं थांबवलं आहे. मात्र त्यांचा मोर्चा सुरुच राहणार आहे. पोलिसांनी शंभू सीमेवरच अडवला. पंजाब-हरियाणा सीमेवर त्यांनी शेतक-यांवर अश्रुधुराचा माराही केला. हमीभावासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतक-यांनी हा मोर्चा काढलाय. मात्र पोलीस आणि सुरक्षा दल त्यांना पुढे जाऊ देत नाही. दरम्यान, सरकारनं आपल्याला चर्चेचं निमंत्रण दिलं नाही, आपल्याला खोटी माहिती दिली जातेय, असा आरोप शेतकरी नेते सरवन सिंह यांनी केलाय. उद्या दुपारी 12 वाजता 101 शेतक-यांचं प्रतिनिधी मंडळ पुन्हा एकदा शांततेत दिल्लीकडे कूच करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 'दिल्ली चलो' मोर्चाला सुरुवात झाल्याने शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा सुरू असलेला विरोध अधिक तीव्र झाला आहे. दिल्ली, पंजाब आणि हरियाणासाठी ही सीमा अत्यंत महत्त्वाची आहे. कधी पोलीस फुलांचा वर्षाव करत आहेत तर कधी अश्रुधुराचा वापर करत आहेत. आजही शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सहकार भारतीच्या 8व्या राष्ट्रीय परिषदेच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी उपस्थित राहणार आहेत. तथाकथित 'दिल्ली चलो मार्च' हs शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन नसून राजकीय पवित्रा आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी केला. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची गरज नाही. त्यांच्या 5 प्रतिनिधींनी येऊन सरकारशी चर्चा करावी. केंद्र आणि हरियाणा सरकार बोलण्यास तयार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे. पीएम मोदी शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करत आहेत. असे असताना काही शेतकऱ्यांना चिथावणी देतायत. त्यांच्या नाराजीतून निर्माण झालेल्या निषेधाचा काही लोक राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचेही मांझी म्हणाले. दरम्यान'पंतप्रधानांनी कारवाई करावी किंवा आम्हाला दिल्लीकडे कूच करू द्या', अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी दिली. "आमचा 101 शेतकरी आणि मजुरांचा गट आला आहे आणि आम्ही या लोकांच्या नावांची यादी आधीच शेअर केली आहे. पोलिसांनी आमच्याकडे ओळखपत्राची पडताळणी करण्याचा आग्रह धरला तर आम्ही त्यांना सहकार्य करु. आम्ही कोणत्याही प्रकारच्या बलिदानास तयार आहोत. त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी किंवा आम्हाला दिल्लीकडे कूच करायला द्यायला हवी, असे शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले. दरम्यान 'दिल्ली चलो' मोर्चात सहभागी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. पोलिसांकडून झालेल्या मोठ्या प्रतिकारानंतर शेतकरी शंभू सीमेवर थांबले. 'आम्ही प्रथम त्यांची (शेतकऱ्यांची) ओळख करून घेऊ आणि त्यानंतर आम्ही त्यांना पुढे जाण्याची परवानगी देऊ. त्यांनी आम्हाला 101 शेतकऱ्यांच्या नावांची यादी पाठवली असून, ते गर्दीत दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी तैनात असलेल्या हरियाणा पोलिस अधिकाऱ्याने दिली. आम्हाला काही शंका आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांची ओळख पटवायची आहे. त्यांचे आय-कार्ड आणि आधारकार्ड बघायचे आहे. पण शेतकरी संघटनेचे लोक आम्हाला ओळखू पटवण्यात सहकार्य करत नाहीत. त्यांना गर्दी करुन पुढे जायचे असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.