MARATHI

Chess World Champion: 11.45 कोटींचं बक्षीस मिळाल्यानंतर डी गुकेशची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'आता आम्ही अधिक...'

सिंगापूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यात भारताच्या डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. वर्ल्ड चॅम्पिअन झाल्यानंतर डी गुकेशला बक्षिसामध्ये 11.45 कोटींची रक्कम मिळाली आहे. दरम्यान डी गुकेशने "मल्टी-मिलियनेअर" टॅग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे सांगताना आपण हा खेळ भौतिक फायद्यासाठी नव्हे तर अखंड आनंदासाठी खेळतो, जो बुद्धिबळ बोर्ड वापरल्यापासून तो टिकवून ठेवू शकला आहे असं सांगितलं आहे. चेन्नईचा 18 वर्षीय गुकेश वर्ल्ड चॅम्पिअन होताच संपत्तीत 11.45 कोटींची वाढ झाली आहे. गुकेशचे वडील रजनीकांत यांनी मुलासाठी ईएनटी सर्जन म्हणून आपली कारकीर्द सोडली तर आई पद्माकुमारी, ज्या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, त्या कुटुंबाची एकमेव कमावत्या आहेत. तुझ्यासाठी करोडपती होण्याचा नेमका अर्थ काय आहे? असं विचारलं असता गुकेश म्हणाला, "याचा अर्थ खूप आहे. जेव्हा मी बुद्धिबळात उतरलो तेव्हा आम्हाला (एक कुटुंब म्हणून) काही कठोर निर्णय घ्यावे लागले. माझे पालक आर्थिक आणि भावनिक अडचणीतून गेले होते. आता, आम्ही अधिक सोयीस्कर आहोत आणि पालकांना त्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही". FIDE ने घेतलल्या मुलाखतीत तो बोलत होता. "वैयक्तिकरित्या पैशांसाठी मी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली नव्हती," असं गुकेशने सांगितलं आहे. दरम्यान जेव्हा आपल्याला पहिल्यांदा चेस बोर्ड मिळाला तेव्हा आपण बुद्धिबळ खेळण्यास का सुरुवात केली हे नेहमी आठवण्याचा प्रयत्न करतो असंही त्याने स्पष्ट केलं आहे. "मी अजूनही तो लहान मुलगा आहे ज्याला बुद्धिबळ आवडतं. ते माझं सर्वात मस्त खेळणं होतं," अशा भावना त्याने व्यक्त केल्या. दरम्यान आपल्यासाठी कुटुंबच सर्व काही असल्याचं तो सांगतो. मुलाला खेळावर लक्ष्य केंद्रीत करता यावं यासाठी वडिलांनी मॅनेजर म्हणूनही त्याचं काम पाहिलं. दुसरीकडे त्याची आई भावनिक साथ देत होती. "ती (आई) अजूनही म्हणते की, तू एक चांगला बुद्धिबळ खेळाडू आहेस हे कळल्यावर मला आनंद होईल. पण तू एक चांगला माणूस आहेस याचा जास्त आनंद होईल", असं डी गुकेशने सांगितलं. अजूनही किशोरवयात असणाऱ्या डी गुकेशला आपण अद्याप विद्यार्थी आहोत असं वाटतं, जो बुद्धिबळाबद्दल जितके अधिक शिकेल, तितकेच त्याला किती कमी माहिती आहे याची जाणीव होईल. "सर्वात महान खेळाडू देखील खूप चुका करतात. जरी तंत्रज्ञान इतके प्रगत आहे, तरीही बुद्धिबळात शिकण्यासारखे बरंच काही आहे. माझा ठाम विश्वास आहे की तुम्ही जितके जास्त काही शिकता तितके तुम्हाला हे समजेल की तुम्हाला ती गोष्ट माहित नाही," असं तो म्हणाला आहे. "जेव्हा मी बुद्धिबळाच्या पटलावर असतो, तेव्हा मला वाटतं की मी काहीतरी नवीन शिकतो. ही अमर्याद सौंदर्याची प्रक्रिया आहे," असं डी गुकेश म्हणाला. प्रवास आणि गंतव्य दोन्ही महत्त्वाचे असून प्रवासाची प्रक्रिया खूप महत्वाची आहे. परंतु गुकेशसाठी, गंतव्यस्थानाबद्दल स्पष्ट असणे अधिक महत्वाचे आहे. "उदाहरणार्थ, मी एक सुंदर खेळ खेळलो आणि हरलो, जर मी चांगला खेळ न खेळता जिंकलो, तर मला आनंद होईल," असं त्याने म्हटलं आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.