MARATHI

पृथ्वीवरुन सर्वात प्रथम नष्ट होणार 'हा' देश; नाव आणि कारण ऐकून बसेल धक्का

South Korea Low Fertility Rate : पृथ्वीचा विनाश अटक आहे. पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत अनेक दावे केले जातात. मात्र, पृथ्वीवरुन सर्वात प्रथम कोणता देश नष्ट होऊ शकते त्या देशाचे नाव समोर आले आहे. या देशाचे नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल. हा देश पृथ्वीवर नष्ट होण्यामागचे कारण देखील खूपच भयानक आहे. पुढील 75 वर्षात या देशातील 70 टक्के लोकसंख्या नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पृथ्वीवरुन सर्वप्रथम नष्ट होणारा देश हा दक्षिण कोरिया असू शकतो अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. दक्षिण कोरिया देश पृथ्वीवरुन नष्ट होण्यामागची कारणे देखील संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी आहेत. आर्थिकदृष्ट्या तसेच आधुनिकीकरणासाठी दक्षिण कोरियाची जगभरात चर्चा आहे. मात्र, या देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने घट होत आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास या शतकाच्या अखेरीस दक्षिण कोरियाची लोकसंख्या दोन तृतीयांश कमी होऊ शकते. त्यामुळे या देशाचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. ही परिस्थिती नियंत्रणात न आल्यास दक्षिण कोरिया पृथ्वीवरून गायब होणारा पहिला देश ठरु शकतो असा दावा केला जात आहे. लोकसंख्येचा दर कमी करण्यासाठी दक्षिण कोरियाने 1960 च्या दशकात विविध कुटुंब नियोजन धोरणे लागू केली. त्या वेळेस दक्षिण कोरियाचे दरडोई उत्पन्न जागतिक सरासरीच्या केवळ 20% होते. प्रजनन दर प्रति स्त्री 6 मुले असा होता. 1982 पर्यंत, आर्थिक वाढीसह, दक्षिण कोरियाचा प्रजनन दर 2.4 पर्यंत घसरला होता. यानंतर दक्षिण कोरियाचा प्रजनन दर झपाट्याने कमी होत आहे. दक्षिण कोरियाची लोकसंख्या सुमारे 51 दशलक्ष आहे. 2067 पर्यंत ही संख्या सुमारे 25-30 दशलक्षांपर्यंत कमी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. दक्षिण कोरियातील वृद्ध लोकसंख्येचा वाटा जगातील सर्वात वेगाने वाढत आहे. 2019 मध्ये, येथील वृद्ध लोकसंख्या 14.9% होती. 2067 मध्ये ते 46.5% असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपलब्ध आकडेवारीवर नजर टाकल्यास 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये देशातील प्रजनन दर 8% कमी झाला आहे. प्रजनन दर असाच घटत राहिल्यास 2100 पर्यंत 51 दशलक्ष लोकसंख्या निम्म्यावर येईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.