MARATHI

जेव्हा गौरीचा भाऊ शाहरुख खानवर करायचा 'दादागिरी'; धमकी देत म्हणालेला...

King of Bollywood Shahrukh Khan: शाहरुख आणि गौरी खान हे बॉलिवूडचे लोकप्रिय कपल आहेत. 1991 मध्ये त्यांनी लग्न केले आणि त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत बनली. पण तुम्हाला माहित आहे का? प्रेम ते लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास सोप्पा नव्हता. विवाहाचा मार्ग सोपा नव्हता. गौरीच्या कुटुंबाचा आणि तिच्या भावाचा दोघांच्या नात्याला खूप विरोध होता. त्याला हे नातं पसंत नव्हतं. तरीही, शाहरुख आणि गौरी यांनी कुटुंबाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी ठरले. आज ते बॉलिवूडमधील सर्वात आयकॉनिक कपल्सपैकी एक आहेत. शाहरुख आणि गौरी यांच्या संसाराचे उदाहरण देतात. आज ते तीन मुलांचे पालक आहेत. शाहरुख खानने 'द कपिल शर्मा शो'मध्ये गौरीच्या भावासोबत झालेल्या वादाची आठवण सांगितली. गौरीचा भाऊ विक्रांत चिब्बर हा त्यांच्या रिलेशनशिपमधला एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय बनला होता. शाहरुखने अलिकडे एका मुलाखतीत खुलासा केला होता की, विक्रांतची आणि त्याची प्रत्येक भेट झाल्यानंतर तो दादागिरी दाखवायचा. "जेव्हाही तो मला भेटायचा तेव्हा तो खूप उद्धटपणे वागायचा, मी सुद्धा मोठा गुंडं होतो, मी हॉकीपटू होतो, त्यामुळे सगळे त्याला नम्रपणे बोलायला सांगत". गौरीचा भाऊ विक्रांत याला हे नाते पसंत नव्हते आणि तो शाहरुखला धमक्या देत असायचा, अशी आठवण शाहरुखने सांगितली. 1994 मधील एका जुन्या मुलाखतीत गौरीने सुध्दा खुलासा केला होता की, "तो (विक्रांत) खूप शांत आणि मस्त माणूस आहे, पण जेव्हा त्याला शाहरुख दिसायचा, तेव्हा त्याला राग यायचा. तो माझ्या बद्दल खूप पझेसिव्ह होता आणि जेव्हा शाहरुख मला पाहायचा, तेव्हा तो चिडलेला असायचा." गौरीने पुढे सांगितले की, विक्रांत शाहरुखला धमक्या देत असे, "मी तुला सर्वांदेखत मारहाण करेन." या धमक्यांमुळे शाहरुखला किती त्रास झाला असावा, पण तो माझा भाऊ असल्यामुळे शाहरुख फक्त "हो, हो, तु जे म्हणशील ते," असे म्हणायचा. हो ही वाचा: आलिया भट्टकडे रणबीर कपूरनं केलं दुर्लक्ष? पाठिंबा देत अभिनेत्री स्वत: आली समोर शाहरुख गौरीसोबत किती प्रामाणिक होता हे आज सगळेच पाहतायेत. या सुरुवातीच्या संघर्षांमुळे त्यांच्या नात्याला आकार मिळाला आणि ते बॉलिवूडमधील सर्वात आयकॉनिक कपल बनले. शाहरुख खान आणि गौरी खान यांची प्रेमकहाणी जेवढी प्रसिध्द होती तेवढाच त्यात दोघांचा संघर्षही होता. त्याच्या लग्नाला आत्ता 33 वर्षे होत आले आहेत.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.