MARATHI

380000000000 रुपयांचा घोटाळा करणारी फरार महिला; 5 देशांचे पोलिस तिच्या शोधात, माहिती देणाऱ्याला 42 कोटींचे बक्षीस

Ruja Ignatova Most Wanted Criminal: क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन (Bitcoin) ने नवा इतिहास रचला आहे. आता एका बिटकॉइनची किंमत 1,00,000 डॉलर इतकी झाली आहे. भारतीय रुपयामध्ये मोजले असता Bitcoin Price 87 लाख रुपये इतकी झाली आहे. क्रिप्टोकरन्सीने उसळी घेतली असतनाच चर्चेत आली आहे की 380000000000 रुपयांचा घोटाळा करणारी 'क्रिप्टोक्वीन' रुजा इग्नातोव्हा. 5 देशांचे पोलिस फरार असलेल्या रुजा इग्नातोव्हाचा शोध घेत आहेत. तिची माहिती देणाऱ्याला 42 कोटींचे बक्षीस देखील जाहीप करण्यात आले आहे. एफबीआयनं टॉप मोस्ट वाँटेडच्या यादीत रुजा इग्नातोव्हाचे नाव आहे. रुजा इग्नातोव्हा पाच देशांतील पोलिसांच्या रडारवर असल्याचं समोर आलंय. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रूजानं क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावावर तब्बल 32 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. रुजा इग्नातोव्हा मुळची बुल्गारिया इथली रहिवासी आहे. रुझा वयाच्या 10 व्या वर्षी जर्मनीत आली. 2005 मध्ये त्यांनी जर्मनीतील विद्यापीठातून पीएचडी केली. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुजाने इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातूनही शिक्षण घेतले आहे. डॉक्टर असली तरी काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं तिचं स्वप्न होतं. बिटकॉईनचं यश पाहून तिनं 2014 मध्ये स्वत:चं वनकॉईन (OneCoin Limited ) लाँच केलं. भविष्यात वनकॉईन हीच जगामध्ये सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी राहील असा दावा केला. लोकांना रातोरात श्रीमंत करण्याचं आमिष दाखवलं. यासाठी ती सेमिनार घ्यायची...मोठ मोट्या पार्ट्या करायची.तिच्या पार्टीला नावाजलेले लोक आवर्जून हजेरी लावायचे. वनकॉईनमध्ये लोकांनी मोठी गुंतवणूक करावी म्हणून तिनं काही एजंटही नेमले होते. पैसे दामदुप्पट होती या आशेनं अनेकजण तिच्या जाळ्यात ओढले गेले. मात्र ,अखेर तिचं बिंग फुटलं. 2017 मध्ये रूजाचा घोटाळा जगासमोर आलाय. फसवणूक केल्याप्रकरणी रुजा इग्नातोव्हावर 8 गुन्हे दाखल आहेत. पाच देशांचे पोलीस तिचा शोध घेतायेत. एफबीआयनं तिच्यावर 1 लाख डॉलरचं बक्षीसही लावलंय. मात्र या सगळ्यांना गुंगारा देत ही सौंदर्यवती फरार झाली आहे. रुझाला अखेरचे ग्रीसमधील अथेन्स येथील विमानतळावर पाहिले गेले होते. असे मानले जाते की ती रशियामध्ये लपली असावी अशी चर्चा आहे. रुझावर फसवणूक, मनी लाँड्रिंग यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. अमेरिकेत तिच्या विरोधात खटला सुरू आहे. एफबीआयने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. रुझावर अमेरिकेने 5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 42 कोटी रुपये) बक्षीस ठेवले आहे. तिची माहिती देणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस दिले जाईल. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये रुजाची हत्या झाल्याची चर्चा झाली आहे. 2018 मध्ये तिची हत्या झाल्याचे बोलले जाते. याची पुष्टी झालेली नाही.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.