MARATHI

IND VS AUS : भारतीय गोलंदाजांना चिडवणाऱ्या फॅन्सना कोहलीने एका इशाऱ्यातच गप्प केलं, Video Viral

IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात आहे. शनिवार 14 डिसेंबर पासून गाबा येथे सुरु झालेल्या तिसऱ्या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे खराब झाला. परंतु दुसरा दिवस हा पावसाच्या अडथळ्याशिवाय पार पडला. यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट्स घेतल्या. दरम्यान गाबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन फॅन्स भारतीय गोलंदाजांना चिडवत होते. त्यावेळी विराट कोहलीने फक्त एक इशारा करून सर्वांना गप्प केलं. शनिवारी गाबा टेस्टला सुरुवात झाल्यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. दुसऱ्या दिवशी ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शासकीय कामगिरी केली. तर उस्मान ख्वाजाने 21, लोबूशेनने 12, ॲलेक्स कॅरीने 45, पॅट कमिन्सने 20 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने रविवारी दिवस अखेरीस 405 धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाच्या गोलंदाजांपैकी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. यात त्याने उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, ट्रेव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श इत्यादींना बाद केले. तर बुमराह वगळता नितेश रेड्डी आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. दुसऱ्या टेस्ट सामन्यात मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात भर मैदानात बाचाबाची झाली होती. ज्यावरून मोहम्मद सिराजला आयसीसीने दंडात्मक कारवाई केली. तर ट्रेव्हिस हेड आणि सिराज या दोघांना मैदानात एकमेकांना दिलेल्या वागणुकीमुळे त्यांना अनुशासनात्मक रेकॉर्डमध्ये 1-1 डिमेरिट पॉईंट्स देण्यात आले. यानंतर सिराज आणि इतर भारतीय गोलंदाजांना मैदानात सामना पाहण्यासाठी आलेले ऑस्ट्रेलियन चाहते ट्रोल करून चिडवू लागले. गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फॅन्स टीम इंडियाच्या खेळाडूंना चिडवत असताना नितीश रेड्डीने लोबूशनला टाकलेल्या बॉलवर विराट कोहलीने कॅच पकडला. तेव्हा विराटने अग्रेसिव्ह सेलिब्रेशन करून तोंडावर बोट ठेवत भारतीय खेळाडूंना चिडवणाऱ्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांना गप्प केले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं. हेही वाचा : Video : मियां मॅजिक! सिराजने बेल्ससोबत असं काही केलं की पुढच्या ओव्हरला लाबुशेनची विकेटच पडली Virat Kohli to Australian crowd who were Booing on Indian bowlers AUSvIND ViratKohli pic.twitter.com/w5C8RloSeW — Jagadeesh Chowdary (urstrulyjaga183) December 15, 2024 यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप. उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.