MARATHI

4 अक्षरांच्या नावासाठी 'या' भारतीयला मिळाले 168 कोटी रुपये; असं काय खास आहे या नावात?

4 letter Name For 168 Crore: जगभरात साधारण मागील दीड ते दोन वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे चॅट जीपीटी! अमेरिकेतील ओपन एआय नावाच्या कंपनीने तयार केलेलं चॅट जीपीटी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असून यासाठी कारणीभूत ठरला आहे एक भारतीय व्यक्ती. खरं तर या कंपनीमुळे हा भारतीय व्यक्ती रातोरात दीडशे कोटींहून अधिक संपत्तीचा मालक झाला आहे. अवघ्या चार अक्षरांचं नाव या भारतीय व्यक्तीने ओपन एआय कंपनीला विकलं असून त्याच्या मोबदल्यात या व्यक्तीला ओपन एआयने तब्बल 1680000000 रुपये म्हणजेच 168 कोटी रुपये दिले आहेत. याचसंदर्भात जाणून घेऊयात... जी व्यक्ती 168 कोटींची मालक झाली आहे तिचं नाव आहे, धर्मेश शाह! आता या व्यक्तीने ओपन एआय कंपनीला काय विकलं? तर त्यांनी रजिस्टर करुन ठेवलेलं डोमेन नेम. म्हणजेच वेबसाईटचं नावावर असलेला मालकी हक्क या व्यक्तीने ओपन एआय कंपनीला विकला. आता असं कोणतं नाव या व्यक्तीने 168 कोटींना विकलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते नाव आहे, chat dot com. धर्मेश शाह हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील फार जुनं नाव असून त्यांनी स्वत:च्या नावावर रजिस्टर केलेलं चॅट डॉट कॉम हे डोमेन नेम जगातील सर्वात जुन्या आणि आजही सक्रीय असलेल्या डोमेन नेमपैकी एक आहे. हे डोमेन नेम विकत घेतल्यानंतर ही वेबसाईट चॅटजीपीटीच्या वेबसाईटवर रियाडरेक्ट करण्यात आली आहे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास आता चॅट डॉट कॉम असं इंग्रजीत सर्ज केलं तर थेट चॅट जीपीटीची वेबसाईट ओपन होते. धर्मेश शाह यांनी चॅट डॉट कॉम हे डोमेन नेम मागच्या वर्षीच विकत घेतलं होतं. आपल्या नावावर 1996 साली रजिस्टर झालेलं हे डोमेन नेम करुन घेण्यासाठी धर्मेश यांनी 130 कोटी रुपये मोजले होते. म्हणजेच वर्षभरात या डोमेन नेमची खरेदी करुन विक्री केल्याने धर्मेश यांना 34 कोटींचा फायदा झाला आहे. धर्मेश यांनी मार्च महिन्यातच हे डोमेन नेम विकल्याचं सांगितलं होतं. मात्र ते कोणाला विकलं हे जाहीर केलं नव्हतं. ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष सॅम अल्टमन यांनी सोशल मीडियावरुन केवळ Chat.com असं पोस्ट करत हे डोमेन नेम विकत घेतल्याचं जाहीर केलं होतं. नक्की वाचा >> बाळाच्या जन्मानंतर सतत ओटीपोटीत दुखायचं! 18 वर्षानंतर कळलं कारण; तिच्या योनीत... हे डोमेन नेम धर्मेश शाह यांच्याकडून घेताना झालेल्या डीलमध्ये ओपन एआय कंपनीचे काही शेअर्सही त्यांना देण्यात आले आहेत. मात्र हे शेअर्स नेमके किती आहेत याचा खुलासा कोणत्याच पक्षाने केलेला नाही. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.