MARATHI

31 st Dec Celebration Planning : वर्षाचा शेवट अथांग समुद्राच्या साक्षीनं... IRCTC चं खास क्रूझ पॅकेज कसं बुक करायचं?

IRCTC Cruise Package : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आता सारं जग सज्ज झालेलं असतानाच काही मंडळी मात्र या वर्षाचा शेवट नेमका कसा करायचा, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यात व्यग्र आहेत. आयत्या वेळी कोणते बेत आखायचे, हा प्रश्नही अनेकांच्याच मनात घर करतोय. अशा सर्वांसाठीच भारतीय रेल्वेच्या अख्तयारीत येणाऱ्या IRCTC कडून एक कमाल बेत सादर करण्यात आला आहे. (New Year 2025) आयआरसीटीसीच्या या बेतानुसार अथांग समुद्राच्या साक्षीनं तुम्हाला वर्षाचा शेवट करता येणार आहे आणि इथं संधी मिळणार आहे ती एका भल्यामोठ्या क्रूझनं प्रवास करण्याची. समुद्रातलं चालतंफिरतं, लाटांवर स्वार होणारं हे एक पंचतारांकित हॉटेल. याच अनोख्या प्रवासासह अथांग समुद्राच्या साक्षीनं वर्षाचा शेवट करण्याची संधी आयआरसीटीसी देत आहे. यासाठीचं एक खास पॅकेजही त्यांनी शेअर केलं आहे. भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्तळावर या पॅकेजसाठीचे सर्व अपडेट आणि सविस्तर माहिती देण्यात आली असून, प्रवासाची वेळ, राहण्याची सोय, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि जहाजावरील इतर सुविधांचीसुद्धा माहिती देण्यात आली आहे. क्रूझ टूरचं बुकिंग करण्यासाठी सर्वप्रथम irctctourism.com या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. तुमच्या आवडीचं ठिकाण निवडून त्यासाठीचं पॅकेज निवडा. इथं तुम्हाला देशांतर्गत आणि परदेशी अर्थात आंतरराष्ट्रीय प्रवासाचे पर्यायही उपलब्ध असतील. त्यामुळं सोयीनुसार पर्याय निवडा. या बुकिंगदरम्यानच तिकीट खर्चात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध असतील याचीही सविस्तर माहिती दिली जाईल. तिकीट बुकींगमध्ये पुढे गेलं असता तिथं सर्व माहिती आणि सुविधांची शाश्वती मिळाल्यानंतर तुम्ही क्रूझ सफरीचं तिकीट बुक करू शकता. आतापर्यंत फक्त रेल्वे आणि हवाई मार्गानंच प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या रेल्वा विभागाच्या या नव्या सुविधेनंही अनेकांचं लक्ष वेधलं आहे. क्रूझ टूर बुक करताना व्यक्तीनं त्यांचा ईमेल आयडी, त्यांचं नाव, दूरध्वनी क्रमांक, प्रवाशांची संख्या अशी माहिती देणं अपेक्षित आहे. माहितीचा सविस्तर तपशील दिल्यानंतर तिथं अंतिम पर्याय म्हणून Submit वर क्लिक केल्यास या ट्रीपचं तिकीट बुक होईल आणि यासाठीचा Confirmation Mail तुमच्या मेल आयडीवर येईल.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.