Rahul Gandhi News: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधकांनी आजदेखील संसदेत भाजपाविरोधात आंदोलन केले. यादरम्यान भाजपा खासदार प्रताप सारंगी हे संसदेत जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. प्रताप सारंगी यांचा आरोप आहे की, 'राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला आणि तो माझ्या अंगावर पडला त्यामुळं माझ्या डोक्याला मार लागला.' प्रताप सारंगी हे उडिसाचे खासदार आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, राहुल गांधी यांनी अन्य एका खासदाराला धक्का दिला त्यानंतर तो खासदार माझ्या अंगावर पडला. ज्यामुळं माझ्या डोक्याला जबर मार लागला. प्रताप सारंगी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात प्रताप सारंगी व्हीलचेअरवर बसलेले आहेत आणि त्यांच्या डोक्याला एक कपडा बांधून ठेवल्याचे दिसत आहे. #WATCH | Delhi | BJP MP Pratap Chandra Sarangi says, "Rahul Gandhi pushed an MP who fell on me after which I fell down...I was standing near the stairs when Rahul Gandhi came and pushed an MP who then fell on me..." pic.twitter.com/xhn2XOvYt4 — ANI (@ANI) December 19, 2024 भाजपा खासदाराने आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांनी यावर उत्तर दिलं आहे, 'भाजपा खासदार येऊ देत नव्हते. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, भाजपा एमपी मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. मला ढकलतं होते तसंच मला धमकावत होते. गांधी यांनी पुढे म्हटलं होतं की, धक्काबुक्की मुळं मला काही होणार नाही. पण हा संसदेचे प्रवेशद्वार आहे आणि आमचा हक्क आहे आत जण्याचा. पण भाजप खासदार आम्हाला आत जाण्यापासून अडवत होते.' #WATCH | Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "This might be on your camera. I was trying to go inside through the Parliament entrance, BJP MPs were trying to stop me, push me and threaten me. So this happened...Yes, this has happened (Mallikarjun Kharge being pushed). But we do not… pic.twitter.com/ZKDWbIY6D6 — ANI (@ANI) December 19, 2024 प्रताप चंद्र सारंगी हे भाजपचे सदस्य आहेत. ते ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातून आहेत. तसंच, सामाजिक सेवा करणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. ते एका सामान्य कुटुंबातून येतात. प्रताप सारंगी 2004 ते 2009 पर्यंत ओडिशा विधानसभेचे सदस्य होते. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना बालासोर लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिले आणि ते निवडूनदेखील आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तथा पशुपालन, डेअरी आणि मत्स्य पालन मंत्रालयात राज्यमंत्री बनवले होते.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
Popular Tags:
Share This Post:
आधी खातेवाटपावरुन आता बंगलेवाटपावरुन मंत्री नाराज? कारणं वाचून डोक्याला मारुन घ्याल हात
December 24, 2024Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
LIVE Updates : संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे
- By Sarkai Info
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, आता 'अनुजा' कडून अपेक्षा
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
अवघ्या 13 गुंठे जमिनीसाठी शेतकऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, धाराशीवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.