MARATHI

भारतात कोरोना नव्हे, भलत्याच रहस्यमयी आजाराचा शिरकाव; मृतांचा आकडा 8 वर, आरोग्य यंत्रणाही पेचात

Mystery illness news : कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात फार सौम्य प्रमाणात झाली आणि पाहता पाहता या संसर्गाचं महाभयंकर रुप संपूर्ण जगानं पाहिलं. साऱ्या जगाला धडकी भरवणाऱ्या याच कोरोनानं आता कुठे माघार घेतली असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजारानं भारतावर संकट आणल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणाही या आजारपणामुळं संकटात सापडली असून, त्यासंदर्भातील कैक प्रश्न अनुत्तरीतच राहिल्यानं हा गुंता सुटताना दिसत नाहीय. भारतात प्रामुख्यानं जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये या रहस्यमयी आजारानं शिरकाव केला असून, बुधवारी रुग्णालयात या आजाराच्या विळख्यानं आणखी एका लहान मुलाचा मृत्यू ओढावला. ज्यानंतर मृतांचा आकडा 8 वर पोहोचल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. परिस्थिती काहीशी नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रभावित गावातील ही प्रकरणं आणि मृत्यूमागच्या कारणाची सखोल माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय विशेषज्ञांचं एक पथक तयार करत त्यांची मदत घेतली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर तपासाला वेग देत या आजाराची ओळख पटवण्यासाठी राजौरीत तातडीनं प्रयोगशाळेची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित घडामोडींदरम्यानमच मोहम्मद रफीक या स्थानिक रहिवाशाच्या 12 वर्षी मुलाला म्हणजेच अशफाक अहमद याचा जवळपास सहा दिवसांच्या उपचारांनंतरही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सुरुवातीला अशफाकला उपचारांसाठी चंदीगढ येथे पाठवण्यात आलं होतं. पण, तरीही त्याला वाचवता आलं नाही. अशफाकचीच लहान भावंड ज्यामध्ये सात वर्षीय भाऊ आणि पाच वर्षीय बहिणीचाही या आजारानंच मृत्यू ओढावल्याचं सांगितलं जात आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच गावातील दोन कुटुंबातील असून, यासंदर्भातील चाचण्यांच्या आधारे आता पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. हे आजारपण नेमकं काय आहे आणि हा संसर्ग नेमका कोणता आहे हे तपासण्यासाठी सध्या आरोग्य यंत्रणेचे अधिकारी युद्धपातळीवर काम करत असून, रॅपिड टेस्टींग आणि अॅनालिसिस अशा टप्प्यांच्या आधारे या आजारपणावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.