MARATHI

'तुझ्या डोक्यात काही...' भर मैदानात वेगवान गोलंदाजावर चिडला रोहित शर्मा, Video होतोय व्हायरल

IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून सध्या या सीरिजचा तिसरा सामना हा ब्रिस्बेन (गाबा) येथे खेळवला जात आहे. शनिवार 14 डिसेंबर पासून सुरु झालेल्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. सोमवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाची फलंदाजी गडगडली. समोर ऑस्ट्रेलियाने उभारलेला 445 धावांचा डोंगर असताना टीम इंडिया मात्र 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून फक्त 51 धावांच करू शकली. दरम्यान पहिल्या सत्रात भारताची गोलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा भारताच्या वेगवान गोलंदाजांवर भडकला. एडिलेट टेस्ट सामन्यात हर्षित राणा फ्लॉप ठरल्यावर कर्णधार रोहित शर्माने आकाश दीपला संधी दिली. गाबा टेस्टमध्ये आकाश दीप भारतासाठी अनेक विकेट्स काढले अशी अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर त्याची गोलंदाजी चालली नाही. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशीच 400 पार स्कोअर केला होता, त्यामुळे टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाला लवकरात लवकर ऑल आउट करण्याचे प्रेशर होते. दरम्यान 114 वी ओव्हर आकाश दीपने टाकली दरम्यान त्याने एक बॉल वाइड बॉल टाकला. पण ऋषभ पंतची उत्कृष्ट फलंदाजीमुळे बॉल बाउंड्री बाहेर जाता जाता राहिला. दरम्यान रोहित शर्मा खूप नाराज दिसला. त्याने आकाश दीपला फटकारलं. रोहित आकाशची गोलंदाजी पाहून म्हणाला, 'डोक्यात काही आहे का..'. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हेही वाचा : बुमराहला 'माकड' म्हणणाऱ्या महिला कॉमेंटेटरचं डोकं ठिकाण्यावर आलं; मागितली माफी, नेमकं काय घडलं? टीम इंडियाची ओपनिंग जोडी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल मैदानात आले. यशस्वीला पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर बाद झाला. तो केवळ एक चौकार ठोकून आल्या पावलीच माघारी परतला. तर त्यापाठोपाठ तिसऱ्या ओव्हरला शुभमन गिल देखील फक्त १ धाव करून माघारी परतला. तर त्यानंतर विराट कोहली (3) आणि ऋषभ पंतने (9) देखील स्वस्तात विकेट गमावली. त्यानंतर केएल राहुलची (नाबाद 33) साथ देण्यासाठी रोहित शर्मा मैदानात आला. परंतु पावसाचे आगमन झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला. काही वेळाने पाऊस थांबला देखील परंतु सामना सुरु करण्यासाठी योग्य परिस्थिती नसल्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ अधिकृतपणे थांबवण्याचा निर्णय अंपायरकडून घेण्यात आला. दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया 394 धावांनी आघाडीवर आहे. Rohit Sharma & Stump-mic Gold - the story continues AUSvINDOnStar 3rd Test, Day 3 LIVE NOW! | ToughestRivalry BorderGavaskarTrophy pic.twitter.com/vCW0rURX5q — Star Sports (StarSportsIndia) December 16, 2024 यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप. उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.