MARATHI

'त्यांना एकटं...'; 'अपमानित केल्याने अश्विनने संन्यास घेतला' म्हणणाऱ्या वडिलांच्या आरोपावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया

Ravichandran Ashwin Retirement : भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) याने 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) तिसऱ्या सामन्याअंती अश्विनने अचानकपणे निवृत्ती जाहीर केल्याने सर्वांनाच धक्का बसला. अश्विन गुरुवारी ऑस्ट्रेलियावरून घरी परतला तेव्हा त्याच्या कुटुंबाने जंगी स्वागत केले. यावेळी वडील रविचंद्रन यांनी मीडियाशी बोलताना अश्विनला अपमानित करण्यात आल्याने त्याने हा निर्णय घेतला असा आरोप केला. अश्विनच्या वडिलांचे हे वक्तव्य खूप व्हायरल झालं आणि त्यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र अखेर अश्विनने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. न्यूज 18 हिंदीला दिलेल्या एका मुलाखतीत अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी सांगितले की, "आम्हाला देखील अश्विनच्या निवृत्तीचा निर्णय शेवटच्या क्षणीच समजला. निवृत्ती घेणं ही त्याची इच्छा होती आणि मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु ज्या पद्धतीने त्याने निवृत्ती घेतली, त्याला अनेक कारणे असू शकतात. ते फक्त अश्विनला माहीत आहे, कदाचित अपमान हे कारण असावे". पुढे रविचंद्रन म्हणाले की, "गेली 14-15 वर्षे तो मैदानावर होता. यात काल अचानक झालेला बदल आणि त्याने घेतलेली निवृत्ती याने आम्हाला खरोखरच एक प्रकारचा धक्का दिला. त्याचवेळी त्याचा सतत अपमान होत असल्याने आम्ही देखील यापूर्वी अशी अपेक्षा करत होतो की अश्विन या सगळ्या गोष्टीअजून किती दिवस सहन करू शकतो? बहुदा यासगळ्यामुळे त्याने स्वतःहून हा निर्णय घेतला असेल". हेही वाचा : मुंबई नाही इथे आहे विराट कोहलीचं सर्वात महागडं घर, किंमत तब्बल 800000000 रुपये वडिलांनी टीम इंडियावर केलेल्या आरोपांवर आर अश्विनने गुरुवारी संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, "माझे वडील मीडिया फ्रेंडली नाहीत. मला कधीच वाटले नव्हते की तुम्ही बाबांच वक्तव्य इतकं गंभीरपणे घ्याल. तुम्हा सर्वांना विनंती आहे की त्यांना क्षमा करा आणि एकटे सोडा". My dad isn’t media trained, dey father enna da ithelaam . I never thought you would follow this rich tradition of dad statements .Request you all to forgive him and leave him alone — Ashwin (ashwinravi99) December 19, 2024 आर अश्विनने 2010 मध्ये श्रीलंके विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचं एकूण क्रिकेट करिअर हे 14 वर्षांचं होतं. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारा आर अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. रविचंद्रन अश्विन या भारताच्या स्टार स्पिनरने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 765 विकेट्स घेतले आहेत. आर अश्विनने 106 टेस्टमध्ये 537 विकेट्स आणि 3503 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याने 116 सामन्यात 156 विकेट्स आणि 707 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये अश्विनने 65 सामन्यात 72 आणि 31 धावा केल्या आहेत.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.