MARATHI

नादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच

Beast Games: जगातील सर्वात मोठा युटूबर म्हणजे मिस्टर बीस्ट (YouTuber Mr Beast). मिस्टर बीस्टचे युट्युबवर 335 दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत, ज्यामुळे तो जगातील सर्वात मोठ्या युट्युब वापरकर्त्यांपैकी एक बनला आहे. मीटर बीस्ट एक नवीन रिॲलिटी शो घेऊन येत आहे. त्याच्या या शो चे नाव आहे बिस्ट गेम्स (Beast Games). त्याचा हा शो 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या शोबद्दल मिस्टर बीस्टने स्वतः पोस्ट केली आहे. त्याने या प्रोजेक्टबद्दल माहिती देणारे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्याने 'बीस्ट गेम्स'साठी 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून टोरंटोमध्ये एक भव्य शहर बनवले आहे. ज्यामध्ये 'बीस्ट गेम्स'चे स्पर्धक असतील आणि ते गेमसाठी एकमेकांशी स्पर्धा करतील. मिस्टर बीस्ट, ज्यांचे खरे नाव जिमी डोनाल्डसन आहे, त्यांने त्यांच्या आगामी रिॲलिटी शो 'बीस्ट गेम्स' च्या सेटचे फोटो आणि व्हिडीओ देखील त्यांच्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. शोच्या सेटच्या आणि नव्याने बांधलेल्या शहराच्या फोटोजने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ही पोस्ट आतापर्यंत अनेक कोटी लोकांनी पाहिली असून २.३ कोटीहून अधिक लोकांनी ती लाईक केली आहे. हे ही वाचा: सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या 'या' वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण... A post shared by MrBeast (@mrbeast) A post shared by MrBeast (@mrbeast) मिस्टर बीस्टच्या या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "मला माफ करा, पण 25 मिनिटांचा व्हिडिओ बनवण्यासाठी 14 मिलियन डॉलर खर्च करणे योग्य नाही. तू हे पैसे कुठेतरी अधिक चांगल्या आणि उपयुक्त ठिकाणी खर्च करू शकतोस." यावर मिस्टर बीस्टने उत्तर दिले, "हम्म, हा 25 मिनिटांचा युट्युब व्हिडीओ नाही, तर हा शो 10 भागांमध्ये बनवला आहे, जो Amazon Prime वर प्रसारित केला जाईल." हे ही वाचा: Fridge Vastu Tips: 'या' 5 गोष्टी चुकूनही फ्रीजवर ठेवू नका, घरातून निघून जाईल सुख-समृद्धी अलीकडे, मिस्टर बीस्ट YouTubers KSI आणि लोगान पॉल यांच्यासोबत पॉडकास्टवर दिसला. या मुलाखतीदरम्यान, त्याने खुलासा केला की 'बीस्ट गेम्स' शोच्या निर्मितीसाठी 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च आला आणि त्याने यापूर्वी 40 पेक्षा जास्त जागतिक विक्रम मोडले आहेत. मिस्टर बीस्ट हा युट्युबवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा युटूबर आहे आणि सध्या त्याचे 335 दशलक्ष सदस्य आहेत.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.