Today Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी... 8 Dec 2024, 20:09 वाजता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि उत्तमराव जानकर आमदारकीची शपथ घेणार आहेत. मारकडवाडी गावाच्या दौऱ्यावर असल्याने आज जयंत पाटील आमदारकीची शपथ घेऊ शकले नाहीत. 8 Dec 2024, 19:17 वाजता अंबरनाथमध्ये विवाहित महिलेचा पाठलाग करत छेड काढणाऱ्या रोडरोमियोला स्थानिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. मात्र पोलिसांनी यावेळी फक्त एनसी नोंदवून या रोडरोमिओला सोडून दिलं. त्यामुळे हा रोडरोमियो आता पुन्हा त्रास देत असल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीनं केलीये. सध्या आम्ही दहशतीच्या छायेत असल्याचं कुटुंबीयांचं म्हणण आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होतीये. 8 Dec 2024, 19:12 वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. विधानसभा उपाध्यक्ष पदाची मागणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. 8 Dec 2024, 18:33 वाजता पुण्यातील बावधन, शिंदेनगर येथे मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. फोटो स्टुडिओला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोठी आग असल्याने धुराचे लोट ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. 8 Dec 2024, 18:11 वाजता मारकडवाडी विषयावर सोलापूर जिल्हाधिकारी आज पत्रकार परिषद घेणार आहेत. संध्याकाळी साडे सहा वाजता जिल्हाधिकारी यांची पत्रकार परिषद होणार आहे. 8 Dec 2024, 17:56 वाजता बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मोगरा या ठिकाणी दोन गटांमध्ये मारहाण. यात्रेदरम्यान कुस्ती सुरू असताना झाला दोन गटांमध्ये वाद. कुस्तीच्या कारणावरून दोन गट आपापसात भिडले. गावामध्ये तणावाचे वातावरण. यात्रेच्या निमित्ताने आयोजित कुस्ती कार्यक्रमांमध्ये झाला दोन गटांमध्ये वाद. 8 Dec 2024, 17:43 वाजता पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आला. इसमाने खोडसाळपणे फोन केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. अज्ञात व्यक्तीकडून खोडसाळपणे पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फोन करणार व्यक्तीचे वय 40 वर्षे असून तो पिंपरी - चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा आहे. या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती देण्यात आली आहे. पिंपरी - चिंचवड पोलिसांकडून या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 8 Dec 2024, 17:17 वाजता सध्या मोबाईल आणि समाज माध्यमांमुळे कुटुंबांमधील रेशीमगाठी विस्कटू लागले आहेत राज्यात अनेक कुटुंब न्यायालयांमध्ये केसेसची संख्या वाढू लागली आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पत्नीकडून अत्याचार करणाऱ्या पतींची एक भव्य परिषद राष्ट्रीय पातळीवर आयोजितकरण्यात आली होती. 8 Dec 2024, 17:02 वाजता महायुतीने बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन करताच आता अनेकांना शिवसेनेसह भाजपामध्ये पुन्हा एकदा परतण्याची घाई झालीय. निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसे भाजपमध्ये दाखल होणार होते मात्र त्यांची तळ्यात मळ्यात स्थिती होती. आता फडणवीस यांच्यासोबत एकनाथ खडसेंनी यांनी दिलजमाईचे संकेत दिल्याने पुन्हा एकदा खमंग राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. 8 Dec 2024, 16:25 वाजता शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात घेऊन पुन्हा आरोग्य खात्याचा पदभार त्यांच्याकडे द्यावा या मागणीसाठी आज पंढरपुरात संत नामदेव पायरी येथे महिलांनी विठुरायाच्या प्रतिमात्मक मूर्तीला अभिषेक घातला. विठुरायाची आरती केली आरोग्य मंत्री असताना सावंत यांनी महिलांसाठी विविध कुटुंब कल्याण योजना आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबवल्या आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांनाच आरोग्य मंत्री करावं असं साकडे विठ्ठलाला घातले आहे. यावेळी महाराज मंडळींनी भजन कीर्तन करत हरिनामाचा गजर केला. None
Popular Tags:
Share This Post:
आधी खातेवाटपावरुन आता बंगलेवाटपावरुन मंत्री नाराज? कारणं वाचून डोक्याला मारुन घ्याल हात
December 24, 2024Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
LIVE Updates : संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे
- By Sarkai Info
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, आता 'अनुजा' कडून अपेक्षा
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
अवघ्या 13 गुंठे जमिनीसाठी शेतकऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, धाराशीवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.