MARATHI

जिथून महाराष्ट्रात सर्वात जास्त लोक नोकरीसाठी येतात 'त्या' राज्यात 27000 नोकऱ्या निघणार; 20000 कोटींचा मोठा प्रोजेक्ट

Adani Group Investment Plan in Bihar: पर राज्यातील लोक मोठ्या संख्येने महाराष्ट्रात नोकरीसाठी येतात. यात बिहारमधून येणाऱ्यांची संख्या स्रावत जास्त आहे. मात्र, आता यांना बिहारामध्येच नोकऱ्या मिळणार आहेत. अदानी एंटरप्रायझेस बिहारमध्ये 20000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे बहिरामध्ये तब्बल 27000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. 'बिहार बिझनेस कनेक्ट' 2024 मध्ये अदानी ग्रुपने मोठी घोषणा केली आहे. या आधीच अदानी ग्रुपने बिहारमध्ये लॉजिस्टिक, गॅस वितरण आणि ॲग्रो लॉजिस्टिक्स या तीन क्षेत्रांमध्ये 850 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अदानी ग्रुप आता या क्षेत्रांमध्ये आणखी 2,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासह अाता अदानी ग्रुप बिहारमध्ये मोठा पावरप्लांट उभारणार आहे. या प्रोजेक्टमध्ये अदानी ग्रुप 20000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रिक वाहन, शहरी गॅस वितरण (CGD) आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) क्षेत्रात अदानी ग्रुप गुंतवणूक करणार आहे. यामुळे 27,000 अतिरिक्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील. अदानी समूहाची बिहारमधील गती शक्ती रेल्वे टर्मिनल, ICD (इनलँड कंटेनर डेपो) आणि औद्योगिक वेअरहाउसिंग पार्क यांसारख्या धोरणात्मक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची देखील योजना आहे. बिहारमध्ये पारंपारिक वीज मीटरच्या जागी नवे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. स्मर्ट मीटरच्या निर्मिती आणि स्थापनेसाठी अदानी ग्रुप 2,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणातत नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. अत्याधुनिक पॉवर प्लांट (अल्ट्रा-सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट) उभारण्यासाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची अदानी ग्रुपची योजना आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.