MARATHI

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 08 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर. 8 Dec 2024, 19:23 वाजता Beed Rada : बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये तुफान राडा. मोगरा गावात दोन गटांमध्ये मारहाण.. यात्रेदरम्यान कुस्ती सुरू असताना दोन गट आपापसात भिडले.. कुस्तीच्या कारणावरून जोरदार राडा.. गावामध्ये तणावाचं वातावरण. 8 Dec 2024, 19:11 वाजता Pune Railway Station Threat : पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी.. पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन.. अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे फोन केल्याची पुणे पोलिसांची माहिती. फोन करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. 8 Dec 2024, 16:06 वाजता Delhi Farmer Agitation : दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतक-यांचं आंदोलन संघटनांनी आजच्या दिवसापुरतं थांबवलं आहे. मात्र त्यांचा मोर्चा सुरुच राहणार आहे. पोलिसांनी शंभू सीमेवरच मोर्चा अडवला. पंजाब-हरियाणा सीमेवर त्यांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा माराही केला, 8 ते 9 आंदोलक शेतकरी जखमी.. हमीभावासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढलाय. मात्र पोलीस आणि सुरक्षा दल त्यांना पुढे जाऊ देत नाही. दरम्यान, सरकारनं आपल्याला चर्चेचं निमंत्रण दिलं नाही, आपल्याला खोटी माहिती दिली जातेय, असा आरोप शेतकरी नेते सरवन सिंह यांनी केलाय. उद्या दुपारी 12 वाजता 101 शेतकऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ पुन्हा एकदा शांततेत दिल्लीकडे कूच करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 8 Dec 2024, 13:39 वाजता Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार सध्या मारकडवाडीत ग्रामस्थांशी संवाद साधतायत. यावरूनच 'पराभव झाला तर स्वीकारायला हवा, पराभवातून शरद पवारांनी शिकायला हवं असं बावनकुळेंनी म्हटलं. पवार जनतेची दिशाभूल करतायत मात्र जनता त्यांच्याबाजूने नाही...ईव्हीएमवर आधी आक्षेप का घेतला नाही असा सवालही बावनकुळेंनी विचारला. 8 Dec 2024, 12:37 वाजता Shivsena MLA : शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार...मंत्रिमंडळात समावेशासाठी इच्छुक आमंदारांचं प्रगती पुस्तक...प्रगती पुस्तकात संजय राठोड, अब्दुल सत्तार नापास...5 आमदार प्रगती पुस्तकात पास 8 Dec 2024, 12:07 वाजता Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरच...राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड निश्चित...दुपारी 12वाजेपर्यंतच अर्ज भरण्याची मुदत...एकमेव अर्ज आल्यानं नार्वेकरांची निवड निश्चित 8 Dec 2024, 11:41 वाजता Leaders of Mahavikas Aghadi took the oath of MLA : मविआचे नेत्यांनी घेतली आमदारकीची शपथ...अधिवेशनाच्या दुस-या दिवशी घेतली शपथ...जय संविधान म्हणत घेतली आमदारकीची शपथ...पटोले, वडेट्टीवार, आदित्य ठाकरेंनी घेतली शपथ 8 Dec 2024, 11:24 वाजता Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांचा अर्ज दाखल...राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला...मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल...भाजपकडून राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी 8 Dec 2024, 10:15 वाजता Rahul Narvekar : विधाससभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरता येणार... राहुल नार्वेकर आज अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार?...राहुल नार्वेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब-सूत्र... चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवारांची नावं चर्चेत बातमीचा व्हिडीओ पाहा- 8 Dec 2024, 09:43 वाजता Legislative Affairs Advisory Committee meeting today : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक...बैठकीत नागपूर अधिवेशनाबाबत चर्चा-सूत्र...नागपूर अधिवेशनाची तारीख आजच ठरणार-सूत्र...विरोधक बैठकीत सामील होणार का याकडे लक्ष बातमीचा व्हिडीओ पाहा- None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.