MARATHI

आलिया भट्टकडे रणबीर कपूरनं केलं दुर्लक्ष? पाठिंबा देत अभिनेत्री स्वत: आली समोर

Alia Bhatt- Ranbir Kapoor : राज कपूर यांच्या 100 व्या जयंती निमित्तानं कपूर कुटुंबानं मिळून मोठा जल्लोष केला. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ ज्यात सैफ अली खान त्याची पत्नी अर्थात करीना कपूरला उठण्यासाठी मदत करताना दिसला. दरम्यान, रणबीरनं आलियाकडे लक्ष दिलं नाही. त्यावरून सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली होती. त्यामुळे अनेकांनी रणबीरला ट्रोल केलं. पण आता आलिया तिच्या नवऱ्याला पाठिंबा देत पुढे आली आहे. आलिया भट्टनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ लाइक केला. त्यात असं लिहिलं आहे की कशा प्रकारे रणबीर कपूरची ती बाजू दाखवण्यात आली नाही. ज्यात तो पूर्णवेळ त्याची पत्नी आलिया भट्टची मदत करताना दिसला. अशा प्रकारे आलियानं न काही बोलता रणबीरला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. या आधी आलिया भट्टची नणंद रिद्धिमा साहनीनं देखील झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की आलिया आणि रणबीर एकत्र आनंदी आहेत. लोक काय बोलतात यानं त्यांना काडीमात्र फरक पडत नाही. रिद्धिमा यावेळी म्हणाली की 'ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांनी सगळ्यांत सुंदर मुलीला राहाचा जन्म दिला आहे. ती खूप गोंडस आहे. तर ते दोघं अप्रतिम आई-वडील आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की त्यांना या गोष्टीची काळजी आहे की लोकं काय म्हणतील.' हेही वाचा : गंभीर आजारामुळे 30 मिनिटंही उभी राहू शकत नव्हती 'ही' अभिनेत्री; सलमानमुळे मिळाला होता ब्रेक दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर आलिया 'जिगरा' नंतर 'अल्फा' और 'लव्ह अ‍ॅन्ड वॉर' या चित्रपटात दिसणार आहे. रणबीरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर नितेश तिवारी 'रामायण' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याशिवाय तो अ‍ॅनिमलच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. त्याशिवाय त्याच्याकडे 'ब्रह्मास्त्र 2' हा चित्रपट देखील आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.