This Maruti Car To Get 5 star Rating: भारतीय कारप्रेमींनी काही दिवसांपूर्वी मारुती कंपनीने एक आश्चर्याचा धक्का दिला. भारतामधील पहिली फाइव्ह स्टार रेटींग कार मारुतीने नव्या डिझायर कारच्या रुपात समोर आणली. ग्लोबल एनकॅप (Global NCAP) रेटींगमध्ये डिझायर कारला पाच रेटींग मिळालं आहे. वयस्कर व्यक्तींची सुरक्षा आणि लहान मुलांच्या सुरक्षेसंदर्भात या कारने स्कोडा कंपनीच्या कारसबरोबरच महेंद्रा स्कॉर्पिओ-एनलाही मागे टाकलं आहे. आता सुरक्षेसंदर्भात टाटाच्या टियागो कारलाही एक कारकडून धोका निर्माण झाला आहे. लॉर्ड टियागो नावाने ओळखली जाणारी ही कार तिच्या बिल्ट क्वालिटीसाठी ओळखली जाते. मात्र या कारची ही ओळख धोक्यात येण्यासाठी मारुतीची एक कार जहाबदार ठरणार आहे. या कारलाही मारुतीच्या डिझायरप्रमाणे टियागोपेक्षाही अधिक रेटींग मिळू शकतं अशी दाट शक्यता आहे. आपण ज्या कारबद्दल बोलतोय तिचं नाव आहे नवीन मारुती स्वीफ्ट सेफ्टी! मारुतीने नुकतीच आपली न्यू डिझायर भारतामध्ये लॉन्च केली. मात्र काही महिन्यांपूर्वीच कंपनीने आपली हॅचबॅक कार्सपैकी सर्वात नामांकित अशा स्वीफ्टचं नवीन व्हर्जन लॉन्च केलं. या दोन्ही कारचं पॅकेज आणि अपडेट्स सारखेच आहेत. मारुतीच्या न्यू डिझायर कारला फाइव्ह स्टार रेटींग मिळण्यासाठी मारुतीने तयार केलेला हॅर्टएट प्लॅटफॉर्म कारणीभूत ठरला आहे. आता या अपडेटेड प्लॅटफॉर्मवर स्वीफ्ट कारची निर्मिती होणार आहे. त्यामुळेच आता स्वीफ्टमध्येही स्टेबल बॉडी म्हणजेच अधिक स्थीर ढाचा असलेली रचना पाहायला मिळेल. ही कार अगदी न्यू डिझायरच्या तोडीस तोड अशी असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या नव्या स्वीफ्टमध्येही न्यू डिझायरप्रमाणे 6 एअरबॅग्स असतील. एकंरदितच सर्व घडामोडी पाहता डिझायरप्रमाणेच नवीन स्वीफ्टही अधिक सुरक्षित असेल असं मोटोरोकॅटीन डॉट कॉमने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. डिझायर कारच्या नव्या व्हर्जनला वरिष्ठांच्या सुरक्षेसंदर्भातील चाचण्यांमध्ये 34 पैकी 31.24 पॉइण्ट्स मिळाले. तर लहान मुलांच्या सुरक्षेसंदर्भात या कारला 49 पैकी 39.20 पॉइण्ट्स मिळालेत. दुसरीकडे स्वीफ्टची सर्वात मोठी स्पर्धक कार असलेल्या टाटा टियागोला सुरक्षेसंदर्भातील 4 रेटींग मिळालं आहे. स्वीफ्टला जर खरोखरच 5 सुरक्षा रेटींग मिळालं तर टाटाच्या लोकप्रिय कारला मोठा फटका बसू शकतो असं मानलं जात आहे. नवीन मारुती स्वीफ्ट सेफ्टीची किंमत 6 लाख 49 हजारांपासून सुरु होते. None
Popular Tags:
Share This Post:
आधी खातेवाटपावरुन आता बंगलेवाटपावरुन मंत्री नाराज? कारणं वाचून डोक्याला मारुन घ्याल हात
December 24, 2024Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
LIVE Updates : संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे
- By Sarkai Info
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, आता 'अनुजा' कडून अपेक्षा
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
अवघ्या 13 गुंठे जमिनीसाठी शेतकऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, धाराशीवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत
MARATHI
- by Sarkai Info
- December 20, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.