MARATHI

शाळेच्या स्नेहसंमेलनात करीनाचा मुलगा बनला हत्ती; लेकाचा डान्स पाहून आनंदानं Cheer करताना दिसली उत्साही आई

Kareena Kapoor Khan and Jeh's Video : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान नेहमीच त्यांच्या मुलांना पाठिंबा देताना दिसतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असं काही झालं की सगळे त्या कुटुंबाचं कौतुक करत आहेत. सैफ आणि करीना यावेळी त्यांच्या मुलाच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये हजेरी लावल्याचे पाहिले. तिथला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत त्याला Cute आणि गोंडस व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. सैफ आणि करीनाचा हा व्हिडीओ एका ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत त्या दोघांनी कॅज्युअल कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. ते त्यांचा मुलगा तैमूरसोबत आणि करीनासोबत ऑडिटोरियममध्ये इतर पालकांसोबत बसून जेहसाठी चिअर करताना दिसले. अनेकांनी स्टेजवर जेहला पाहिल्यानंतर सगळ्यांचं लक्ष त्याची आई करीनाकडे गेलं. त्या व्हिडीओत करीना कपूर ही अती उत्साही आईप्रमाणे जेहला पाठिंबा देताना दिसते. kareena as a proud mother, saif and tim filming jeh's school presentation. the family they are. pic.twitter.com/gk3IOJc4EF — letícia (@itsmeletii) December 17, 2024 करीनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेटं दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'बेबोनं तिच्यासाठी एक चांगलं आयुष्य बनवलं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कसलं गोंडस कुटुंब आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मला हे कुटुंब खूप आवडतं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'मला असं वाटतं की करीना आणि जिनिलिया या दोघीच आहेत ज्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.' करीना आणि सैफ नेहमीच त्यांच्या मुलांसोबत वेळ व्यथित करताना दिसतात. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. फक्त करीना आणि सैफ नाही तर त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांची देखील चाहत्यांमध्ये तितकीच क्रेझ आहे. हेही वाचा : आलिया भट्टकडे रणबीर कपूरनं केलं दुर्लक्ष? पाठिंबा देत अभिनेत्री स्वत: आली समोर करीना नेहमीच तिच्या करिअर आणि कुटुंबामुळे चर्चेत असते. हे दोघे कपल सेटवर आणि घरात त्यांच्या मुलांसोबत वेळ व्यथित करताना दिसतात. अनेकदा ते संपूर्ण कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जातात. दरम्यान, करीनाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर करीनाचा आगामी चित्रपट 'दायरा' आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे.

NZ
319/8
(83.0 ov)
VS
ENG
Full Scorecard →

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.