TRENDING

अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video

कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र आहे असे म्हटले जाते कारण तो अत्यंत निष्ठावान असतो. आयुष्यभर आपल्या मित्राची आणि मालकाला साथ देतो, कधीही त्यांना सोडून जात नाही. अनेकदा संकटात मदतीलाही धावून येतो. एखाद्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो. पण, एका अस्वलाने कुत्र्यावर हल्ला केल्यानंतर प्रत्यक्षात जीवनात एका माणसाने कुत्र्याचा जीव वाचवला आहे सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका अस्लवालाने कुत्र्यावर हल्ला केल्यानंतर एका माणसाने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये त्याचा जीव वाचवला. व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते की एका झाडाला बांधलेल्या कुत्र्यावर एक अस्वल हल्ला करतो. अस्वलाने कुत्र्याची मान जबड्यात पकडली आहे पण तेवढ्यात एक धाडसी माणूस हातात फळी घेऊन मदतीला धावून आणि कुत्र्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. प्रथम व्यक्ती कुत्र्याला जोरात ओढतो आणि अस्वलाच्या जबड्यातून सोडवतो. त्यानंतर कुत्रा पुन्हा अस्वलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात धाडसी माणूस कुत्र्याला मागे उडतो आणि अस्वलासमोर जोरात एक फळी आपटून त्याला घाबरवतो. अस्वल घाबरून मागे हटते आणि झाडाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ तिथेच संपतो. हेही वाचा – चूक कोणाची? अंत्योदय एक्स्प्रेसची तोडफोड! संतप्त प्रवाशांनी ट्रेनची फोडली काच, धक्कादायक घटनेचा Video Viral Man protect a dog from bear attack ? pic.twitter.com/u2NnYMJ6pn u व्हिडिओ जवळपास ३० लाख लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. एकाने लिहिले, “त्या माणसाला देखील अस्वलाला यशस्वीपणे विचलित करणारी पद्धत माहित असल्याचे दिसते. असे वाटले की, “जणू काही ही पहिली किंवा दुसरी वेळ नव्हती, त्याने आधीही अस्वलाचा सामना केला असावा” “झाडाला बांधलेल्या कुत्र्याला सोडवणे आणि तेथून एकत्र पळ काढणे चांगला पर्याय ठरला असता”, असे दुसऱ्याने सांगितले “ते पूर्ण वाढ झालेले तपकिरी किंवा काळा अस्वल नाही, ते तुलनेने लहान आहे,” तिसऱ्या वापरकर्त्याने सांगितले. हेही वाचा – “काला शा काला”, पंजाबी गाण्यावर थिरकले आजी-आजोबा; मनमोहक व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर येईल हसू “घटनेचे नेमके स्थान अज्ञात असले तरी, बहुतेक अंदाजांनी ते तुर्कीच्या जवळ किंवा तेथील घटना असल्याचा अंदाज बांधला. कुत्रा Kangal Shepherd आहे आणि त्याचा शत्रू सीरियन तपकिरी अस्वल (Syrian brown bea) आहे, जो युरेशियन तपकिरी अस्वलाची उपप्रजाती आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.