TRENDING

Video : कधी शाळेत गेली नाही पण बोलते तब्बल ६ भाषा; ‘या’ पाकिस्तानी मुलीची एकच चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. येथे दरदिवशी हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. कधी गावातील, तर कधी शहरातील, अनेकदा इतर देशातील सुद्धा व्हिडीओ चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पाकिस्तानी मुलगी दिसेल जी चक्क ६ भाषांमध्ये बोलते. विशेष म्हणजे ती कधीही शाळेत गेली नाही. सध्या या पाकिस्तानी मुलीची एकच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एका पाकिस्तानी व्लॉगरनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. (A Pakistani girl who never went to school speaks 6 languages watch amazing video) या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की व्लॉगरच्या सर्व प्रश्नांना उत्तर देत पाकिस्तानची ही मुलगी सांगते, “माझ्या वडिलांना १४ भाषा बोलता येतात आणि मला सहा भाषा बोलता येतात. मी कधी शाळेत गेली नाही. माझे वडील मला शिकवतात आणि तेच माझे शिक्षक आहे. मला उर्दू, इंग्रजी, चित्राली, सिराकी, पंजाबी, आणि पश्तो या सहा भाषा बोलता येतात.” ती पुढे सांगते, “मी शेंगदाणे आणि सूर्यफुलाच्या दाणे विकते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला सांगा” हेही वाचा : मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच A post shared by ZS MotoVlogs (@doctor_zeeshan) doctor_zeeshan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तिचा आत्मविश्वास खूप आवडला” तर एका युजरने लिहिलेय, “या मुलीला शाळेची काहीही गरज नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला तिचे उच्चार आवडले” एक युजर लिहितो, “मला या मुलीचं कौतुक आहे पण शाळा ही शिक्षणासाठी खूप महत्त्वाची आहे.” तर एक युजर लिहितो, “मी तिला भेटलो. ती खूप छान आहे.” हेही वाचा : Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले शुमिला ही पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रदेशातील लोअर दीर येथे राहते. तिला ५ आई आहेत आणि ३० भावंडे आहेत. सध्या या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.