Arvind Kejriwal Dr Babasaheb Ambedkar Viral Video : दिल्लीत विधानसभा निवडणूकीपूर्वी संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आरक्षण यांसह अनेक मुद्द्यांवरून जोरदार राजकारण सुरू आहे. प्रत्येक पक्ष दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकमेकांना दलितविरोधी ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असल्याचे लाइटहाऊस जर्नलिझमला आढळून आले. नऊ सेकंदांच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये आप नेते केजरीवाल यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी अतिशय गंभीर विधान केल्याचा दावा करण्यात आला आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिताना दारूच्या नशेत होते”, असे विधान केजरीवालांनी केल्याचा दावा यात करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करावी, अशी मागणीही काही सोशल मीडिया युजर्स करीत आहेत. पण, खरंच अरविंद केजरीवाल यांनी असे कोणते विधान केले होते का, याविषयी आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी व्हायरल व्हिडीओमागची एक खरी बाजू समोर आली आहे, ती बाजू नेमकी काय आहे ते जाणून घेऊ… एक्स युजर विभोर आनंदने त्याच्या प्रोफाईलवर व्हायरल झालेल्या दाव्यासह एक व्हिडीओ शेअर केला आहे. BR Ambedkar was drunk while writing the Constitution: @ArvindKejriwal He should be Arrested Share this maximum pic.twitter.com/QVmnLCK5dR इतर युजर्सदेखील तीच व्हिडीओ क्लिप शेअर करीत आहेत. संबिधान को दारू पीकर लिखा गया था, मतलब केजरीवाल के अनुसार अम्बेडकर साहेब नें संबिधान दारू पीकर लिखी थीं ? pic.twitter.com/2HMKazgDYB According to Arvind Kejriwal, Baba Saheb wrote the Constitution after drinking alcohol. A Sanghi is and will always be anti-Dalit and anti-constitutional. Kejriwal's views are so similar to those of the Sanghis, it is why he is called Chhota Sanghi! #Ambedkar pic.twitter.com/41cGIOmGXB BR Ambedkar was drunk while writing the Constitution: @ArvindKejriwal He should be Arrested बाबा साहब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान #Ambedkar #babasahabambedkar pic.twitter.com/Qt2VxLr7Iw “जिसने संविधान लिखा होगा, उसने भी दारू पी कर ही संविधान लिखा होगा”…!!! THE "MOST NOTORIOUS FRAUD" IN INDIAN POLITICS…!!! ??????? pic.twitter.com/IPb9PfHNPt A post shared by Unfiltered Jammu Kashmir (@unfilteredjnk) आम्ही व्हिडीओचा कमेंट सेक्शन तपासून, आमचा तपास सुरू केला. यावेळी तिथे आम्हाला ब्लॅक अॅण्ड व्हाईट व्हिज्युअल व्हिडीओऐवजी रंगीत व्हिडीओ आढळला. आम्ही या व्हिडीओतील व्हिज्युअल्सवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च चालवले. तसेच, आम्हाला या व्हिडीओच्या तळाशी काही लोक डोक्यावर AAP च्या टोप्या घालून बसल्याचे दिसले, ज्यावरून केजरीवाल खुल्या व्यासपीठावर उभे राहून भाषण देत असतानाचा हा व्हिडीओ होता हे लक्षात आले. कमेंट सेक्शनमधील हा व्हिडीओ २२ सेकंदांचा होता. पण, याच व्हिडीओचा एक मोठा भाग आम्हाला आढळला; ज्यात अरविंद केजरीवाल काँग्रेसच्या पक्षघटनेबद्दल बोलत असल्याचे लक्षात आले. Well @ArvindKejriwal ’s inspiration for doing Liquor Scam revealed by Aapiyas themselves… Jo daaru se Kare itna pyaar woh congress ko kaise karega inkaar… ??? pic.twitter.com/OCxJNBELTZ आम्ही मग त्याच व्हिडीओचा इंटरनेटवर शोध सुरू केला. यावेळी आम्हाला आणखी एका व्हिडीओचे शीर्षक मिळाले : कांग्रेस का संविधान क्या कहता है?, हा व्हिडीओ २३ डिसेंबर २०२४ रोजी व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता, यावरुन हा व्हिडीओ आजच अपलोड करण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही आम आदमी पार्टीचे YouTube चॅनेल तपासले आणि व्हिडीओ सेक्शनमध्ये ‘most oldest video’ असा फिल्टर लावून तपास सुरू ठेवला. त्यानंतर आम्ही एकामागून एक समान दिसणारे व्हिडीओ तपासले. यावेळी आम्हाला १२ वर्षांपूर्वी चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ मिळाला. व्हिडीओमध्ये साधारण चार मिनिटांवर अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीच्या घटनेबद्दल बोलताना दिसले. यावेळी ते “त्यांच्या पार्टीचे संविधान अद्वितीय म्हणत पक्षाच्या नवीन वेबसाइटची घोषणा करतात आणि लोकांना वेबसाइटवर अपलोड केले जाणारे संविधान वाचण्याचे आवाहन करतात. ते पुढे, इतर पक्षांची घटना बनावट आहे, असे म्हणत काँग्रेसचे उदाहरण देतात. सुमारे चार मिनिटे ४० सेकंदांत ते म्हणताना दिसतात की (भाषांतर), “काँग्रेस पक्षाच्या घटनेत म्हटले आहे की, कोणत्याही कार्यकर्त्याने दारू पिऊ नये. आमच्यापैकी कोणीतरी त्यावर म्हणाले की, ज्याने हे संविधान लिहिले आहे, तो ते लिहिताना नक्की दारूच्या नशेत असावा.” आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दारूच्या नशेत संविधान लिहिलं” असे कोणतेही विधान केलेले नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये केजरीवाल काँग्रेस पक्षाच्या घटनेबद्दल बोलत होते; पण यावेळी त्यांनी कुठेही त्यांनी भारतीय राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव उच्चारलेले नाही. त्यामुळे व्हायरल केली जाणारी क्लिप एडिटेड असून, त्याबरोबर केला जाणारा दावा खोटा आहे. None
Popular Tags:
Share This Post:
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
December 23, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.