Viral Video: समाजमाध्यमांमुळे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे. सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ, अशा प्रकारच्या विविध गोष्टी व्हायरल होत असतात. यावर अनेकदा जुनी गाणीदेखील खूप चर्चेत असतात. या झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. अशाच एका जुन्या गाण्यावर एक चिमुकली डान्स करताना दिसतेय. यावर नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली ‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकली करत असलेल्या डान्समधील स्टेप्स एकापेक्षा एक असून तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही लक्षवेधी आहेत. चिमुकलीचा डान्स पाहून युजर्स तिचं कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत सहा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. हेही वाचा: ‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून पाहा व्हिडीओ: A post shared by Katha Shinde (@kathashinde) एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खरंच सुंदर डान्स’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘जबरदस्त डान्स व्हिडीओ’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एक नंबर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘हिरोईन.’ None
Popular Tags:
Share This Post:
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
December 23, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.