TRENDING

VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल

Wedding bride dance video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे. नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तिचा डान्स पाहून सासरचे मंडळींही अवाक् झाले आहेत. आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. कधी नवरीचा डान्स तर कधी नवरदेवाचा डान्स तूफान व्हायरल होतो. असाच एक व्हडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात नवरी मुलगी डान्स कराताना दिसतेय तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीही पाहायला मिळत आहेत. हा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हीडिओत नवरीनं “मराठमोळा, थोडासा साधा भोळा, लाखामंदी एक, पोरगा पाहिजे हा दिलवाला” या गाण्यावर आपल्या नवऱ्यासाठी खास डान्स केला आहे. पाहा व्हिडीओ A post shared by ? मुक्काम पोस्ट शिवगणवाडी ? (@mukkam_post_shivganwadi) हेही वाचा >> शाळेत नापास झाला चिमुकला, म्हणाला “आधी टेन्शन होतं पण…” मंडळी मजेदार VIDEO चा शेवट अजिबात चुकवू नका हा व्हिडीओ सोशल मीडियावर mukkam_post_shivganwadi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी या व्हिडीओवर एकानं “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी पाहून नवरदेवही लाजला असेल”. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.