TRENDING

विमान सोडा, आता मुंबई लोकलमध्ये प्रवास करतेय ट्रेन सुंदरी! महिलांच्या डब्यात दिली विशेष सूचना, VIDEO एकदा पाहाच

Train hostess in Mumbai local: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. यात महिलांचा डबाही तितकाच खास असतो. इथे जेवढी भांडणं होतात, तेवढीच मजा मस्तीदेखील होते. याशिवाय लोकलमध्ये अनेकदा तृतीयपंथीयांना तुम्ही पाहिलं असेल. तृतीयपंथी आले की आपोआप अनेकांची मान मोबाइलमध्ये जाते, तर काही जण झोपी गेल्याचं नाटक करतात. पण, सध्या अशा एका तृतीयपंथीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जिला पाहून तिच्या कलेला तुम्ही नक्कीच दाद द्याल. महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या या तृतीयपंथीने सगळ्यांसमोर एक जबरदस्त कला सादर केली. हेही वाचा… असे लोक येतात तरी कुठून? आजी आजोबांच्या श्रद्धांजली सभेत तरुणीने केली हद्द पार, स्टेजवर गेली अन्…, VIDEO पाहून संताप होईल अनावर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक तृतीयपंथी ट्रेनमध्ये आपली कला सादर करताना दिसतेय. तुम्ही अनेकदा विमानात हवाईसुंदरीने दिलेल्या सूचना ऐकल्या असतील, पण व्हिडीओमध्ये ट्रेनसुंदरी सूचना देताना दिसतेय. मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात एक तृतीयपंथी सगळ्यांसमोर काही सूचना देताना दिसतेय. ती म्हणते, “नमस्कार, ट्रेन में आपका स्वागत है, कृपया अपने सीट बेल्ट खोल लिजिए, क्योकी हमारी ट्रेन अभी प्रस्थान करने वाली है, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसके लिए.” पुढे मस्करी करत ती म्हणते, “जितनी आपने तिकीट निकाली थी उतने पैसे खतम हो चुके है, कृपया गाडी से दफा हो जाए, सूचना समाप्त.. धन्यवाद!” A post shared by Devi Waghela (@devi_waghela_) सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @devi_waghela_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “ट्रेन होस्टेस आ गयी है, ऑन पब्लिक डिमांड” असं कॅप्शन याला देण्यात आलं आहे. या अकाउंटवर ट्रेनमधले असेच अनेक व्हिडीओ तिने पोस्ट केले आहेत. तसेच हा व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ८.३ मिलियन व्ह्युज आले आहेत. हेही वाचा… ‘ती’ त्याच्या मांडीवर बसली अन्…, चालत्या गाडीमध्ये कपलचा रोमान्स, VIDEO पाहून कपाळावर माराल हात तृतीयपंथी महिलेचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “छत्रपती शिवाजी महाराज असं तुम्ही बोललात त्यातच तुमचे संस्कार दिसले… अप्रतिम.” तर दुसऱ्याने किती छान बोलली आहे अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “महाराज बोलून मन जिंकलत ताई” तसंच “रेल परी”, “खूप छान व्हिडीओ आहे”, “तुम्ही खूप सुंदर दिसता” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.