TRENDING

“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप

Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy: कल्याणमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यानं मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पेण शहरात भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेचा अरेरावी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेनं थेट मराठी माणसालाच भाषेवर सवाल उपस्थित केलाय. तुम्‍ही काशी, बनारसला जाता मग आम्‍ही हिंदी बोललं तर काय बिघडतं, असा सवाल हिंदी भाषक महिलेनं मराठी भाषकांना विचारलाय. परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेचा व्हिडिओ पेणमध्ये व्हायरल होत आहे. मराठी बोलण्‍यावरून वादाचा हा व्हिडीओमुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आलाय. मुंबई आणि कल्‍याणमधील मराठी भाषक आणि हिंदी भाष‍क यांच्‍यातील वाद राज्यात चर्चेत आहे. त्यातच पेण शहरातील एक व्हिडिओ समोर आलाय. ही भाजी विक्रेती महिला ग्राहकांसोबत उद्धटपणे बोलत असून ,’मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो…’ असे ती ग्राहकाला हिंदीमध्ये सांगताना दिसत आहे. परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेच्या या अरेरावीचा, उद्धटपणाचा, हा व्हिडिओ पेणमध्ये व्हायरल होत आहे. मराठी बोलण्यावरून वादाच्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान या परप्रांतीय महिलेविरूद्ध पेण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेला ताब्यात घेतले आहे. त्‍या महिलेच्‍या फोनवर सुरू असलेल्‍या संभाषणावरून ग्राहक तिला मराठीत बोलायला सांगत आहेत. मात्र आपल्‍याला मराठी येत नाही तुम्‍ही हिंदी बोला असं ती ग्राहकांना सांगते. यासंर्भात तिने पेण पोलीस ठाण्‍यात फोन करून याबाबत तक्रार करत आहे. काशी, बनारसला अंघोळ करायला जाता ना मग आम्‍ही हिंदी बोललं तर काय बिघडते. हिंदी भारताची भाषा नाही का? असा सवाल या हिंदी भाषक महिलेने उपस्थित केल्‍याचे या व्हिडिओतून दिसत आहे. पाहा व्हिडीओ े हेही वाचा >> सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका काही दिवसांपूर्वी नालासोपारा येथे TC ची मुजोरी पाहायला मिळाली गेल्या काही वर्षापासून परप्रांतिय आणि मराठी भाषा हे वाद मोठ्या प्रमाणात निर्दशनास येत आहे. मात्र सर्व समोर येत असलेल्या या घटना मुंबई शहरातील असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी नालासोपारा स्टेशनवरुन जात असलेल्या अमित पाटील या प्रवाशाला त्याच रेल्वे स्टेशनवर असलेल्या रितेश मौर्या या टीसीने रेल्वे तिकीट दाखवण्यास सांगितल त्यानंतर अमित पाटील प्रवाशाने आपल्याला हिंदी येत नसून कृपया मराठीत बोला असे टीसीला सांगितले मात्र मुजोर रितेश मौर्या या टिसीने मराठी बोलण्यास नकार दिला आणि प्रवाशासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर पोलिसांनीही बोलावून अमित पाटील या प्रवाशाला धमकावण्यातही आले असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर प्रवाशाकडून यानंतर मी मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही, मराठी भाषेची मागणी करणार नाही असं लिहून घेतल. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.