TRENDING

सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

Shocking video: सोशल मीडियावर कायम आपल्याला कायम अपघातांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. अनेकदा घडलेले अपघातांची कारण वेगवेगळी असतात. मग कधी व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे मोठे अपघात होतात तर कधी वाहनांच्यामध्ये प्राणी आल्याने असे अपघाच घडतात. सध्या सोशल मीडियावर अशा एका अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्की अपघात कसा घडला आणि पुढे काय झाले ते व्हायरल व्हिडिओतून पाहा. भारतीय लोक गाईला आई मानून तिची पूजा करतात. त्यामुळे गाईला गोमातादेखील म्हटलं जातं. गाय फक्त तिच्या वासरांनाच नाही, तर माणसांनाही आईसारखा जीव लावताना दिसते. पण, अनेकदा काही लोक मुद्दाम किंवा नकळत गाईबरोबर असं काही करतात जे पाहून अनेकांना धडकी भरते. आता सोशल मीडियावरील असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून तुम्हीही हळहळ व्यक्त कराल. कारण एका कार चालकाने गाईच्या बछड्याला धडक दिली आणि त्याला सुमारे २०० मीटरपर्यंत ओढत नेलं. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची? ही घटना छत्तीसगडमधील असून भर दिवसा रस्त्यावरुन चालणाऱ्या गाईच्या वासराला कार चालकाने उडवलं, तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं वासराला अक्षरश: सुमारे २०० मीटरपर्यंत ओढत नेलं. यानंतर शेवटी आईचं काळीज, हे पाहून गाय कारच्या पाठी कळप घेऊन धावत आली आणि कारच्या समोर उभी राहिली. बऱ्याचवेळ आजूबाजूच्या लोकांना काही कळत नव्हते की हा गाईंचा कळप नेमका अशा पद्धतीनं कारच्या भवती क उभा आहे? कारला पुढे का जाऊ देत नाहीये? मात्र थोड्याच वेळात कारखाली गाईचं वासरु अडकल्याचं दिसतं. यानंतर त्या वासराला बाहेर काढण्यात येतं. पाहा व्हिडीओ A post shared by Political Aura (@political_aura) हेही वाचा >> VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप सोशल मीडियावर हा व्हिडीओ political_aura नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे तर हा व्हिडीओ शेअर करताना युजरने लिहलं आहे की, “हा व्हिडिओ रायगड, छत्तीसगडचा आहे. गायीचे वासरू गाडीखाली आल्यावर गाडी पुढे जाऊ नये म्हणून गाय धावत येऊन गाडीसमोर उभी राहिली. लोकांनी बछड्याला वाचवले आणि आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत.” हा व्हिडीओ पाहून नेटकरी कार चालकावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.