TRENDING

साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Husband Wife Video: आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळणं म्हणजे नशीबच समजायचं. आपल्या सुख-दुःखात नेहमी साथ देणारा जोडीदार असला की सगळ्या संकटांना सामोरं जायला बळ मिळतं. आपल्या आवडीच्या माणसाचा क्षणभर सहवास जरी लाभला तरी तो हवाहवासा वाटतो. या नात्यात फक्त प्रेम आणि प्रेमाची अपेक्षा असते आणि दोन्ही बाजूने प्रेम जर समान असेल तर आयुष्याचा प्रवास सुखकर होतो. प्रत्येक नातं जपायला थोडी अधिकची मेहनत घ्यावीच लागते. लहान-सहान गोष्टीने आपल्या त्या नात्याला फुलवणे गरजेचे असते. या नात्यात नवरा-बायकोचं नातं खूप पवित्र मानलं जातं. एकमेकांबद्दल प्रेम, तितकाच आदर आणि विश्वास असणारं नात हे असतं. आपल्या वाईट परिस्थितीतही आपली बायको तितकीच साथ देतेय, आपल्या बरोबर ती खंबीरपणे उभी राहतेय याचं समाधान नवऱ्याला असतं. प्रत्येकालाच हे जमत नाही, पण ज्यांना जमतं त्यांचा संसार नक्कीच सुखाचा होतो. हेही वाचा… चिमुकल्याच्या अंगावर बाईक पडली अन्…, खेळता खेळता खेळता घडली दुर्घटना! पाहा धक्कादायक VIDEO सोशल मीडियावर नवरा-बायकोचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात वाईट काळातही बायको आपल्या नवऱ्याबरोबर सावलीसारखी उभी आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ट्रकच्या मागे एक कपल बसलेलं दिसत आहे. ट्रकमध्ये सामान असताना थोड्याशा जागेत ते दोघं बसले आहेत आणि अशा वाईट वेळेतही दोघे एकमेकांबरोबर अगदी आनंदी दिसत आहेत. A post shared by Lay Bhari – लय भारी (@lay_bhari_official) या ट्रकच्या मागे कार आहे आणि कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात ते खरंच!” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २२ लाखांपेक्षा अधिक व्ह्युज आले आहेत. हेही वाचा… “जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान नवरा-बायकोचं सुंदर नातं जपणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बायकोचं असं प्रेम मिळायला भाग्य लागतं,” तर दुसऱ्याने “छान जोडी आहे तुमची” अशी कमेंट केली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.