TRENDING

Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले

Pune Video : सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होतात. पुणेरी पाट्यांपासून येथील ऐतिहासिक वास्तू किंवा प्राचीन मंदिरांचे अनेक व्हिडीओ चर्चेत येतात. कधी पुणेरी भाषेवरून तर कधी पुणेरी खाद्यपदार्थांवर सोशल मीडियावर चर्चा रंगते. पीएमटी बसचा विषय असो किंवा येथील पुणेरी लोकांचा विषय असो नेहमी चर्चेत येतो. पुणे एक लोकप्रिय शहर आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील अनेक तरुण मंडळी नोकरी आणि शिक्षणासाठी पुण्यात येतात त्यामुळे पुणे हे नेहमी चर्चेत येतं. पुण्यातील कोणताही विषय, घटना लवकर व्हायरल होते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यावर तुम्हाला एक पीएमटी बस दिसेल. या बसच्या समोरची काच पडलेली दिसत आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांना वाटेल की खूप मोठा अपघात घडला आहे पण असं काहीही नाही. नेमकं काय घडलं, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. हेही वाचा : सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भररस्त्यावर एक पीएमटी बस दिसेल. या पीएमटीचा बस नंबर १५४ आहे. बसवर पुणे स्टेशन असे लिहिलेले आहे. बसची अवस्था पाहून तुम्हालाही धक्का बसेल. बसची पुढील काच खाली पडलेली आहे. येणारे जाणारे लोक बसकडे बघताना दिसत आहे. काही लोक या बसजवळ जमलेले आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय झालं? या व्हिडीओत याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. या व्हिडीओवर एका युजरने कमेंट केली आहे की ज्या वेळी घटना घडली त्यावेळी ती व्यक्ती तिथे उपस्थित होती. खूप वेगाने बस चालवत असल्यामुळे बसची काच खाली पडली, असा दावा केला आहे. A post shared by Mangesh Gade (@gademangesh564) हेही वाचा : ‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video gademangesh564 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वेगाने बस चालवताना अचानक त्याला ब्रेक दाबावा लागला अन् असा परिणाम झाला..” तर एका युजरने लिहिलेय, “माझ्या समोरच झाले हे. चालवा आणखी वेगाने” आणखी एका युजरने लिहिलेय, “इलेक्ट्रिक बसला २५ किमी/तासाची स्पीड लिमीट ठेवली पाहिजे. सगळे ड्रायव्हर तुफान बस चालवतात आणि अगदी जवळ आले की हॉर्न वाजवतात” अनेक युजर्सनी पीएमटी बस चालकांवर टिका केली आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.