TRENDING

हे काय चाललंय पुण्यात! बेशिस्तपणाचा कळस; थेट फुटपाथवरून चालवताहेत गाड्या, VIDEO होतोय व्हायरल

Viral Video : पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरच्या फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडल्याची घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून इतर लोक जखमी आहे. ही घटना अगदी ताजी असताना पुण्यातील एक आणखी व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक थेट फुटपाथवरून गाड्या चालवताना दिसत आहे. पुण्यातील बेशिस्तपणा पाहून कोणालाही संताप येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (pune video people are driving bikes on a foothpath careless people in pune video goes viral on social media) हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय? कुणालाच उत्तर आलं नाही; शेवटी मराठी माणसानं काय उत्तर दिलं पाहा; मुंबईतला VIDEO व्हायरल बेशिस्तपणाचा कळस; थेट फुटपाथवरून चालवताहेत गाड्या (Pune Bikers Ride on Footpath recklessly) या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दुचाकीस्वार फुथपाथवरून गाड्या चालवताना दिसेल. व्हिडीओत तुम्हाला भयंकर ट्रॅफीक दिसेल. त्यात लोकांना ट्रॅफीकमधून बाहेर पडण्याची सर्वात जास्त घाई असते. ट्रॅफीकमधून बाहेर पडण्यासाठी काही लोक चक्क फुथपाथवरून गाड्या चालवताना दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “फुटपाथ नव्हे एक्स्प्रेस वे; हा शॉर्टकट योग्य आहे का?” हेही वाचा : बेरोजगारीचं भीषण वास्तव! औषधांच्या दुकानातून ग्राहकांना अक्षरश: भाजीवाल्यांप्रमाणे बोलावतायत; Video पाहून व्हाल अवाक् A post shared by Pune Trends (@punetrends_) u हेही वाचा : Video : कधी शाळेत गेली नाही पण बोलते तब्बल ६ भाषा; ‘या’ पाकिस्तानी मुलीची एकच चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच punetrends_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही पण घेता का.?? हा शॉर्टकट” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्व पुणेकर असेच करतात” तर एका युजरने लिहिलेय, “ऑफीस वेळेत कसं जाणार, मेट्रो नाही, लोकल नाही आणि ट्रॅफिक जाम” आणखी एका युजरने लिहिलेय, “योग्य नाही पण लोकांकडे ऑप्शन नाही” तर एक युजर लिहितो, “बाहेरून आलेल्या लोकांमुळेच आपले हाल झाले आहे” एका युजरने लिहिलेय, “मेट्रोमुळे रस्ते छोटे झाले व गाड्या चालवायला जागा राहिली नाही” अनेक युजर्सनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. काही युजर्सनी पुण्यातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.