TRENDING

तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत

Viral Video : अंकशास्त्रामध्ये अंकांना खूप महत्त्व आहे. शून्य ते नऊ, प्रत्येक अंक आपल्या स्वभावाविषयी आणि व्यक्तिमत्वाविषयी बऱ्याच गोष्टी सांगतो. सोशल मीडियावर अनेकदा मनोरंजनाच्यादृष्टीने अंकांवरून किंवा जन्मतारीखवरून किंवा जन्म महिन्यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी सांगितले जाते. मुळात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या माहितीला अनेकदा अंकशास्त्राचा सुद्धा पुरावा दिला नसतो. तरीसुद्धा लोक आवडीने ते व्हिडिओ लाईक करतात, शेअर करतात आणि त्यावर प्रतिक्रिया सुद्धा देतात (Really last digit of your mobile number tell about your nature and personality watch viral video on social media) सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबरच्या शेवटच्या अंकावरून व्यक्तीचा स्वभाव सांगितला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ जवळपास एक लाख लोकांनी लाईक केला आहे. जाणून घेऊयात, काय आहे त्या व्हिडिओमध्ये.. हेही वाचा : Fact check :”भारताला गोवण्यासाठी पन्नूने स्वतःवरच केला असावा हल्ला”, वॉशिंग्टन पोस्टच्या नावाने खोटा लेख चर्चेत, नेमकं काय आहे प्रकरण? या वायरल व्हिडिओमध्ये एका तरुणीने कागदाचा छोटा तुकडा हातात धरलाय आणि त्या कागदाच्या तुकड्यावर लिहिलेय.. ० – झोपाळू १ – रागीट २ – मनमिळावू ३ – विनोदी ४ – हुशार ५ – कष्टाळू ६ – आकर्षक ७ – शौर्यवान ८ – मेहनती ९ – जिज्ञासु हेही वाचा : ‘मॉडर्न आई…’ बाळाच्या अंतिम संस्कारासाठी रडत बसण्यापेक्षा तयार होतानाचं बनवलं रील; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक् Kiran_handwriting इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलेय, ” सांगा मग तुम्ही कसे आहात?” या व्हिडिओवर अनेक युजर्स मी प्रतिक्रिया दिल्यात. काही युजर्सने ‘मनमिळावू’ तर काही युजर्सने ‘कष्टाळू’ असल्याचे सांगितले. काही युजर्सने ‘शौर्यवान’ तर काही युजरने ‘झोपाळू’ असल्याचे सांगितले. अनेक युजर्सनी त्यांच्या मोबाईलचा शेवटचा आकडा सांगत त्यांचा स्वभाव सांगितले. एक युजर लिहितो, “अगदी खरंय. मी खूप मेहनती आहे” तर दुसरा युजर लिहितो, “५० टक्के हे खरं असू शकतं पण पूर्णपणे नाही.” यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. अशा व्हिडीओवर लोक अधिक प्रतिसाद देतात. व्हिडीओ शेअर करतात आणि लाईक करतात. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.