TRENDING

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी चिमुकला वादक सज्ज! छोटासा ढोल कंबेरला बांधून करतोय वादन, पाहा Video Viral

कला ही सर्वात मोठी देणगी असते. प्रत्येकाच्या अंगात काही ना काही कला ही असतेच फक्त ती ओळखून अंगी जोपासावी लागते. ढोलताशा वादन ही अशीच एक कला आहे जी अनेकजण आवडीने जोपासतात. सणवारानिमित्त, गणपतीच्या स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेकजण ढोल ताशा वाजवताना दिसतात. आपले ऑफिस, कॉलेज सांभाळून अनेक लोक ढोल-ताशाचे वादन करतात.नियमित सराव करतात. बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरु सध्या गणरायाच्या आगनाचे वेध सर्वांना लागले आहे त्यामुळे सर्वत्र बाप्पााच्या स्वागताची तयारी सुरू आहे. ढोल-ताशा पथक महिनाभरापासून वादनाचा सराव करत आहे. शहरात संध्याकाळच्या वेळी अनेकदा ढोल-ताशा पथकाचा आवाज आपल्या कानावर पडत असतो. सोशल मीडियावरही ढोल-ताशा पथकांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या अशाच एका चिमुकल्या वादकाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी हा चिमुकला वादक सज्ज आहे. चिमुकल्याचे वादन ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत. चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. हेही वाचा – Video :”फास्टफूडसमोर चटणी भाकरी ठरली सरस!”, ७५ वर्षाच्या आजी मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, पटकावला तृतीय क्रमांक A post shared by Aradhya As Nakaashe (@aradhya_as_nakaashe) हेही वाचा – स्वारगेट बसस्थानक की बस तळे! पावसामुळे पाहा कशी झाली अवस्था, Video होतोय व्हायरल व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, ढोल ताशा पथकाच्या एक मंडळ वादनाचा सराव करत आहे. प्रत्येकाने ढोल कंबरेला बांधलेले आहेत आणि वादनाचा सराव सुरु आहे. या वादकांमध्ये एक चिमुकला वादकही दिसत आहे ज्याने छोटासा ढोल आपल्या कंबरेला बांधला आहे आणि सर्वांसह तो देखील वादनाचा सराव करत आहे. चिमुकल्या वादकाचा उत्साह पाहून सर्वांनाच कौतुकं वाटत आहे. चिमुकला वादक दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष देऊन अचूकपणे वादन करत आहे. वादन करताना त्याचे हावभाव देखील लक्ष वेधून घेणारे आहेत. बाप्पााच्या स्वागतासाठी चिमुकल्याचा उत्साह पाहून बाप्पा नक्कीच आनंदी होईल. हेही वाचा – मुंबईतील डेटिंग घोटाळा उघड! पुरुषांना भेटण्यास बोलावून घातला हजारो रुपयांना गंडा; काय आहे नेमकं प्रकरण? हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर aradhya_as_nakaashe या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी चिमुकल्याचं भरपूर कौतुक केले आहे. एकाने कमेंट केली की, “मार्केट जाम केलं वाघानी.” दुसरा म्हणाला की, “एवढ्या कमी वयात एकदम परफेक्ट ठोका!” तिसरा म्हणाला की, “वादक बनायला वय आणि उंची महत्वाची नसते, नादच ढोल ताशांचा असला पाहिजे” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.