TRENDING

Krishna Janmashtami 2024: चॉकलेटच्या बॉक्सपासून बनवा श्री कृष्णाचा पाळणा; VIDEO तून पाहा सोप्पी सजावट

Krishna Janmashtami 2024: काही दिवसांपूर्वीच रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. तुमच्यातील अनेकांना भेटवस्तू म्हणून चॉकलेट किंवा कॅडबरी सेलिब्रेशन मिळालं असेल. चॉकलेट बॉक्स किंवा कॅडबरी सेलिब्रेशन खाऊन झाल्यानंतर आपण ते बॉक्स सहसा फेकून देतो. पण, आज आपण त्याचा एक अनोखा उपयोग करून पाहणार आहोत. तर उद्या जन्माष्टमी (Krishna Janmashtami) आहे. श्रावण महिन्यामधील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात. तर आज आपण श्री कृष्णाच्या पूजेसाठी चॉकलेटच्या रिकामी बॉक्सच्या मदतीने घरच्या घरी पाळणा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत… श्रीकृष्णाचा पाळणा तयार करण्यासाठी तुम्हाला चॉकलेटचा रिकामी बॉक्स, फेव्हिकॉल, रंगीबेरंगी कापड, थर्माकोल, मोत्यांच्या माळा इत्यादी साहित्य लागेल. १. चॉकलेटचा रिकामी बॉक्स घ्या, त्याचे झाकण काढून बाजूला ठेवून द्या . २. वर्तुळाकार बॉक्सच्या आकाराचा एक थर्माकोल कापून घ्या. घरी उपलब्ध असलेल्या रंगाचा त्यावर कापड घाला, त्याला साजेल अशी बॉर्डर लावा आणि कपड्यांच्या गम किंवा फेव्हिकॉलने कापड चिटकवून घ्या. ३. घरात एखादा पुठ्ठा किंवा छोटा चॉकलेटचा बॉक्स असेल तर त्याला सुद्धा अशाचप्रमाणे कापड लावून घ्या आणि चॉकलेटच्या मोठ्या बॉक्सवर ठेवा. ४. त्यानंतर त्याच्यावर एक रिंग चिटकवून ठेवा आणि मोत्याच्या माळांनी सजावट करा. ५. नंतर श्री कृष्णासाठी आसन बनवण्यासाठी थर्माकोल कापून घ्या, त्याला आवडीच्या रंगाचा कापड चिटकवून घ्या आणि मधोमध श्री कृष्णाची मूर्ती ठेवा. ६. तर अशाप्रकारे तुमचा घरच्या घरी श्रीकृष्णासाठी पाळणा तयार झालेला तुम्हाला व्हिडीओत दिसेल.घरच्या घरी तयार झालेल्या सुंदर श्रीकृष्णाचा पाळणा एकदा तुम्हीसुद्धा बघाचं… हेही वाचा… Anand Mahindra: पावसाळ्यात डासांपासून संरक्षण कसं करावं? मुंबईकरांना आनंद महिंद्रांनी सुचवला उपाय; मशीनद्वारे डास पकडण्याची दाखवली टेक्निक व्हिडीओ नक्की बघा… A post shared by Nupur Rahar (@sunshine_window) सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sunshine_window या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आकर्षक श्री कृष्णाचे पाळणे तुम्हाला मार्केटमध्ये दिसून येतील. पण, जर तुम्हाला घरी असणाऱ्या मोजक्या साहित्यात कृष्णाचा पाळणा (Krishna Janmashtami) तयार करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता. तर अशाप्रकारे चॉकलेटच्या रिकामी बॉक्सच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी कृष्णाचा पाळणा बनवा आणि मनोभावे पूजा करा. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.