TRENDING

Dahi Handi 2024 : दहीहंडी सण का साजरा केला जातो? मुंबईत हा सण कशा प्रकारे साजरा होतो? घ्या जाणून

Dahi Handi 2024 Date Time: देशभरात दरवर्षी दहीहंडी सण मोठ्या उत्साहाने जल्लोषात साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्रासह गुजरात, गोव्यात या सणाचा थाटमाट मोठा असतो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला दहीहंडीचा सण साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमीच्या एका दिवसानंतर येणारा हा सण भगवान कृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून या सणाचे महत्त्व आहे. पण हा सण नेमका कशा पद्धतीने साजरा होतो, त्याचे महत्त्व काय ते जाणून घेऊ… दहीहंडी हा सण दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी तो मंगळवार, २७ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. तर, जन्माष्टमी आज सोमवारी २६ ऑगस्टला आहे. अष्टमी तिथीला प्रारंभ – २६ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३९ वाजता अष्टमी तिथी समाप्ती – २७ ऑगस्ट रोजी पहाटे २.१९ वाजता Read More Dahihandi Special News : Dahi Handi 2024: गोविंदा रे गोपाळा! मुंबईतील ‘या’आहेत प्रसिद्ध मानाच्या दहीहंड्या, नक्की भेट द्या दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील आठवणींना उजाळा देणारा सण आहे. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, खोडकर बालकृष्णाला दही. दूध आणि लोणी (माखन) खूप आवडायचे. त्या काळी गोकुळात दूध, दही, लोणी साठवून ठेवले जात होते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह शेजारच्या घरांतून दही आणि लोणी चोरण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे त्यावेळी गोकुळातील महिलांनी भगवान कृष्णांच्या मित्र-सवंगड्यांच्या हाती दही-लोणी लागू नये म्हणून दही आणि लोण्याची मडकी छताला टांगायला सुरुवात केली. यावेळी कृष्ण मित्र-सवंगड्यांसह पिरॅमिड बनवून मडकी फोडायचे आणि दही खाण्याचा आनंद घ्यायचे. असा खोडसाळपणा कृष्ण व त्याचे सवंगडी करीत असले तरीही गोकुळातील रहिवासी आनंदी होते. दहीहंडी उत्सव बालगोपाळांच्या बालपणापासूनच्या या खेळकर गमतीजमतींची आठवण करून देतो. दहीहंडी हा कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर भारतात साजरा केला जाणारा सर्वांत महत्त्वाचा सांस्कृतिक खेळ आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक खेळात त्याचे रूपांतर झाले आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान हंडी म्हणजे मातीचे मडके दूध, दही, लोणी किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांनी भरले जाते आणि नंतर ते जमिनीपासून उंचावर टांगले जाते. मग स्वतःला गोविंदा म्हणून संबोधणारे त्यांचे संघ उंचावर टांगलेल्या हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ती फोडण्यासाठी मानवी मनोरे (पिरॅमिड) तयार करतात. त्यानंतर ‘गोविंदा आला रे’ म्हणत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी हंडी फोडणे गोविंदा पथकांना कठीण जावे यासाठी त्यांच्या अंगावर पाणी टाकले जाते. अलीकडच्या काळात दहीहंडी सणाला मोठ्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आता विजेत्या गोविंदा पथकांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या रकमा बक्षीसरूपाने देण्यास सुरुवात झाली आहे. हा उत्सव केवळ गोविंदांच्या शारीरिक सामर्थ्याची आणि टीमवर्कचीच परीक्षा घेत नाही; तर प्रत्येकाला भगवान कृष्णाची क्रीडाभावना, उत्साहीपणा अनुभवता यावा असा त्याचा उद्देश असतो. विशेषत: महाराष्ट्रात दहीहंडी सणाचेन वेगळेपण पाहायला मिळते, यातही मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये दहीहंडी सणाची एक वेगळी मज्जा असते, अनेक पारंपारिक आणि राजकीय पक्षांच्या मानाच्या दहीहंड्या पाहायला मिळतात. अनेक गोविंदा पथकांमध्ये उंचच उंच मानवी मनोरे रचून या मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी चढाओढ सुरु असते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.