TRENDING

डोळ्यात ना लाज ना पश्चाताप; पाकिस्तानात महिलेनं दोघांना चिरडल्यानंतरही चेहऱ्यावर हास्य, VIDEO चा शेवट आणखी संतापजनक

Pakistani Woman smiles after crushing 2 people: पाकिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आला असून या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा संतापजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानातील एक महिला आपल्या कारने दोघांना चिरडल्यानंतरही हसताना दिसत आहे. तिला आपल्या कृत्याचा काहीच पश्चाताप नसून वर ती माझे वडिल कोण आहेत माहितीये का? अशी विचारणा करतेय. या महिलेविरुद्ध आता देशभरात संतापाचा भडका उडाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. डोळ्यात ना लाज ना पश्चाताप कराचीच्या कारसाझ रोडवर १९ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रख्यात उद्योगपती दानिश इक्बालची पत्नी नताशा दानिश हिच्यावर तिची टोयोटा लँड क्रूझर बेदरकारपणे चालवल्याचा आरोप आहे, ज्यामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरील व्हिडिओ, मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि यामुळे महिलेने केलेल्या कृत्यामुळे लोकांच्या संतापात आणखी भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराचीतील कारसाज रोडवर ही घटना घडली. अपघातानंतर तिला ताब्यात घेतले जात असताना नताशा गर्दीकडे पाहून हसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या उद्धट वागणुकीचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे. यात बाप-लेकीच्या जोडीला जीव गमवावा लागला आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. नताशा तिची एसयूव्ही वळवण्याचा प्रयत्न करत असताना मोटारसायकलला धडकली. त्यानंतर, कार आणखी दोन दुचाकीस्वारांना धडकली. यानंतर एका व्हिडिओमध्ये, ती म्हणताना ऐकू येते, तुम मेरे बाप को नही जानते. या घटनेने कडक कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नताशाला न्यायालयात हजर न केल्याने पोलिसांवरही टीका करण्यात आली आहे. तिचे वकील अमीर मनसुब यांनी दावा केला की नताशाचे मानसिक आरोग्य अस्थिर आहे आणि तिच्यावर जिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाहा व्हिडीओ A post shared by Trending Today Magazine ? (@trendingtodaymagazine) हेही वाचा >> एवढी हिम्मत येतेच कुठून? विद्यार्थ्याची मुख्याध्यापकांना मारहाण; VIDEO पाहून तुम्हीच सांगा यामध्ये चूक कुणाची? सोशल मीडियावर हा व्हिडीओ trendingtodaymagazine नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर युजर्स संतापजनक प्रतिक्रिया देत महिलेवर टीका करत आहेत. एका युजरने कमेंटम केलीय की, “हीला कठोर शिक्षा झाली पाहिजे,” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “हे फक्त पाकिस्तानातच होऊ शकतं. “ None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.