TRENDING

अधिकारी झाल्यावर तरुण झाला भावूक! आजीच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसा ढसा रडला, Video पाहून व्हाल भावूक

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो तर कधी काही व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येते. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेत पास झालेला एक तरुण भावूक झालेला दिसत आहे. त्याच्यासह त्याची आजी सुद्धा भाऊ झालेली या व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या आई डोळ्यात पाणी येईल. या तरुणाचा संघर्ष या व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्पर्धा परीक्षेला दरवर्षी हजारो विद्यार्थी बसतात. निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आलाय. या व्हिडिओमध्ये एक तरुण गुलालाने माखलेला दिसत आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. तो त्याच्या आजीच्या खांद्यावर डोकं ठेवून ओक्साबोक्शी रडताना दिसतोय. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून आजी नऊवारीच्या पदरने त्याचे डोळे पुसत आहे. फक्त त्याची आजी नाही तर इतर आजीच्या वयातील महिला सुद्धा त्याला धीर देत आहे. आजीसह सर्व वृध्द महिला त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मायेने हात फिरवत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडिओवर लिहिलेय, “भावाचे अश्रू सांगतात किती कष्ट असतील. आई पाहिजे होती आता भावा यार. आजीचे प्रेम बघा भावांनो. परिस्थितीच्या छाताडावर बसून भावाचा दणदणीत विजय, याला म्हणतात जिद्द” हेही वाचा – ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रेने लाडक्या बाप्पासाठी गायले गाणे, तुम्ही ऐकले का? पाहा Viral Video A post shared by स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ? (@spardhapariksha.mpsc.upsc) हेही वाचा – रेल्वे रुळ ओलांडताना पाय घसरून पडली महिला, अंगावरून धावली मालगाडी; थरारक घटनेचा Video Viral spardhapariksha.mpsc.upsc या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भावा अभिनंदन” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी ‘अभिनंदन भावा’ लिहत कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे ईमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. स्पर्धा परीक्षेला असलेले विद्यार्थी पास झाल्यानंतर आनंद साजरा करताना दिसतात. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.