TRENDING

अय्या, किती गोड! रील बनवता बनवता भावा-बहिणीचं सुरू झालं भांडण; VIDEO पाहून येईल हसू

Brother-Sister Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच विविध विषयांवरील अधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी भयानक थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओंचा समावेश असतो, तर कधी आपलं मनोरंजन करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात दोन निरागस भाऊ-बहीण सुंदर रील करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणतो. खरंच लहान मुलं खूप निरागस आणि निर्मळ असतात. त्यामुळे त्यांना आपण जे सांगतो, जे शिकवतो, त्याच गोष्टी ते लक्षपूर्वक पाहतात आणि करतात. हल्लीच्या लहान मुलांमध्ये सोशल मीडियाबद्दलही खूप आकर्षण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरील रील्स, गाणी, विविध व्हिडीओ ते पाहतात आणि तसाच डान्स, अभिनय करण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लहान भाऊ-बहीण ‘इधर चली मै उधर चली’ या हिंदी गाण्यावर अभिनय करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन खूप सुंदर आणि पाहण्यासारखे आहेत. या व्हिडीओमध्ये पुढे ते एकमेकांशी भांडताना दिसतात आणि नंतर त्यांच्या आईकडे पळत जाताना दिसत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @avi.rashi या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, यावर आतापर्यंत १४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर नऊ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. हेही वाचा: ‘याला म्हणतात डान्स’… ‘गुटर्रSS गुटर्रS’ गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक पाहा व्हिडीओ: A post shared by Negi & Family (@avi.rashi) एका युजरने लिहिलंय की, “लहान मुलं रील बनवत आहेत आणि आम्ही अजूनही कार्टून बघतोय.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप निरागस मुलं आहेत”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “एक नंबर रील”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “अरे यांचे आई-वडील कुठे असतात.” None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.